अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि साऊथ सुपरस्टार विक्रम यांचा बहुचर्चित चित्रपट ‘पोन्नियिन सेल्वन’चा ट्रेलर रिलीज झाला आहे. चेन्नईमध्ये या चित्रपटाच्या एक भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यामध्ये चित्रपटाच्या ट्रेलरबरोबरच चित्रपटाचे म्युझिकही लाँच करण्यात आले. या कार्यक्रमाला साऊथचे सुपरस्टार रजनीकांत आणि कमल हासन खास पाहुणे म्हणून आले होते. यावेळी रजनीकांत यांनी सांगितले की त्यांना मणिरत्नम यांच्या चित्रपटात एक व्यक्तिरेखा साकारायची होती, परंतु दिग्दर्शक मणिरत्नम यांनी त्यांना चित्रपटात भूमिका देण्यास स्पष्टपणे नकार दिला.
आशिकी ३ मध्ये कार्तिक आर्यनबरोबर दिसणार जेनिफर विंगेट? निर्माते म्हणाले…
‘पोन्नियिन सेल्वन’ चित्रपटाच्या ट्रेलर लाँचवेळी रजनीकांत म्हणाले, “मला या (पोन्नियिन सेल्वन) चित्रपटाचा भाग व्हायचं होतं. मी मणिरत्नम यांना ‘पेरिया पळवेत्तरयार’ची भूमिका मला द्या, असं सांगितलं. या चित्रपटात मी स्पेशल अपिअरन्स करण्यासही तयार असल्याचं त्यांना सांगितलं. पण मणीने मला साफ नकार दिला. ते म्हणाले, ‘तुमच्या चाहत्यांनी माझ्यावर रागवावं, असं तुम्हाला वाटतं का? मला वाटतं मणीच्या जागी दुसरं कोणी असतं तर कदाचित मला चित्रपटात काम देण्यास तयार झाला असता, पण मणीने नकार दिला. म्हणूनच तो मणिरत्नम आहे.”
“त्या भीतीने लोक…”; ‘गुडबाय’ सिनेमाच्या ट्रेलर लाँच सोहळ्यात एकता कपूर अश्रू अनावर
रजनीकांत पुढे म्हणाले, “मी जेव्हा चित्रपटाची कथा वाचली, तेव्हा मी कमलला अरुलमोळी वर्मनच्या भूमिकेत, श्रीदेवी यांना कुंडवईच्या, विजयकांत यांना आदित्य करिकलनच्या आणि सत्यराजला पजुवेत्रयारच्या भूमिकेत इमॅजिन केलं होतं.”
दरम्यान, ऐश्वर्या राय स्टारर या चित्रपटाचा ट्रेलर चेन्नईच्या नेहरू इनडोअर स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला होता मणिरत्नम यांचा ‘पोन्नियिन सेल्वन’ हा एक ऐतिहासिक चित्रपट असून एका कादंबरीवर आधारित आहे. या चित्रपटात ऐश्वर्या राय पहिल्यांदाच दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट हिंदी व्यतिरिक्त तामिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्येही ३० सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे.