सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून एक गाणं तुफान ट्रेंडमध्ये असल्याचं दिसतंय ते म्हणजे ‘माणिके मगे हिते’. श्रीलंकेतील सिंगिंग सेंसेशन असलेल्या योहानीने सिंहली भाषेत हे गाणं गायलं आहे. खास करून सोशल मीडियावर या गाण्यावर रील्स बनवण्याचा ट्रेंड पहायला मिळाला. या गाण्यामुळे योहानीला चांगलीच प्रसिद्धी देखील मिळालीय. काही दिवसांपूर्वीच योहानीने ‘बिग बॉस १५’च्या मंचावर देखील हजेरी लावली होती. यावेळी सलमानने योगाही सोबत तिचं गाणं गाण्याचा प्रयत्न केला होता.

यानंतर आता योहानी बॉलिवूड पदार्पणासाठी सज्ज झाली आहे. भूषण कुमार यांची निर्मिती असलेल्या ‘थँक गॉड’ या सिनेमातून की बॉलिवूडमध्ये पाऊल टाकणार आहे. या सिनेमात योहानीच्या या सुपरहिट गाण्याच्या हिंदी वर्जनचा समावेश करण्यात आला असून हे गाणं योहानीच गाणार आहे.
‘थँक गॉड’ हा सिनेमा रोमॅण्टिक कॉमेडी सिनेमा असून या सिनेमात अजय देवगन, सिद्धार्थ मल्होत्रा आणि रकुल प्रीत मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. २०२२ सालामध्ये हा सिनेमा रिलिज होणार आहे. तर या सिनेमातील योहानीचं ‘माणिके मगे हिते’ हे गाणं तनिष्कने कंपोज केलंय. रश्मी विराजने या गाण्याचे हिंदी बोल लिहिले आहेत. लकरच या गाण्याचं शूटिंग सुरु करण्यात येणार आहे.

कंगनाने शेअर केले ‘धाकड’ सिनेमातील हटके लूक, समांथाने दिली फोटोंना पसंती


तर बॉलीवूड सिनेमासाठी गाण्याची संधी मिळाल्याने योहानीने देखील आनंद व्यक्त केलाय. या गाण्यासाठी ती पुन्हा लवकरच भारतात येणार आहे. योहानीचं हे गाणं गेल्या वर्षी मे महिन्यात यूट्यूबवर रिलीज झालं होतं. त्यानंतर ते सोशल मीडियावर चांगलच व्हायरल झालं. हे गाणं सिंहली भाषेत असल्याने भारतीयांना ते समजू शकलं नसलं तरी गाण्यातील योहानीचा मधूर आवाज आणि गाण्याच्या म्युझिकने अनेक जण गाण्याच्या प्रेमात पडले.

Story img Loader