प्रसिद्ध मणिपुरी गायक आणि गीतकार अखू चिंगंगबम यांचे शुक्रवारी अपहरण झाले होते, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. अज्ञात बंदूकधाऱ्यांनी इंफाळ येथील त्यांच्या घरातून भरदिवसा अपहरण केले, अशी माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली. ‘इम्फाळ टॉकीज’ या बँडचे ते गायक आहेत. घरातून अपहरण केल्यानंतर सुमारे २० किलोमीटर अंतरावर त्यांना अपहरणकर्त्यांनी सोडून दिलं, असं कळतंय.

“शुक्रवारी सकाळी काही सशस्त्र लोक खुराई येथील चिंगंगबम यांच्या घरात घुसले आणि त्यांना सुमारे २० किमी दूर असलेल्या ठिकाणी घेऊन गेले,” असे गायकाच्या नातेवाईकाने सांगितले. अज्ञात बंदूकधार्‍यांनी त्यांना घरापासून लांब गेल्यावर कोणतीही इजा न पोहोचवता सोडून दिलं. पोलिसांनी या घटनेची पुष्टी केली आहे.

अभिनेत्री नसूनही कोट्यवधींची मालकीण आहे अर्जुन कपूरची बहीण, अंशुला कपूर नेमकं काय काम करते? जाणून घ्या

‘एनडीटीव्ही’ ने दिलेल्या वृत्तानुसार, “चिंगंगबम यांचे शुक्रवारी अज्ञात लोकांनी अपहरण केल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. नंतर आम्हाला अशी माहिती मिळाली की त्यांना कोणतीही इजा न करता सोडण्यात आले आहे,” असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

“माझे पात्र…”, राम मंदिराच्या उद्घाटनाचं निमंत्रण न मिळाल्याने ‘रामायण’मधील लक्ष्मण नाराज, म्हणाले…

गायकाच्या अपहरणामागचे कारण अद्याप कळू शकलेले नाही, परंतु दिवसा घडलेल्या या घटनेमुळे सर्वजण चिंतेत आहेत. अपहरणकर्त्यांनी कोणतीही खंडणी मागितली नाही किंवा गायकाच्या कुटुंबियांनी अद्याप पोलिस तक्रार दाखल केलेली नाही, अशी माहिती चिंगंगबम यांच्या नातेवाईकांनी दिली.

Story img Loader