मणीरत्नम दिग्दर्शित ‘पोन्नियिन सेल्वन २’ हा ऐतिहासिक चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून बॉक्स ऑफिसवर त्याने जबरदस्त कामगिरी केली आहे. पहिल्या भागाप्रमाणेच या भागावरही लोकांनी भरभरून प्रेम केलं आहे. अवघ्या चार दिवसांतच या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बरेच रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. जगभरात या चित्रपटाने जबरदस्त कलेक्शन केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘पोन्नियिन सेल्वन २’ला समीक्षकांनीही उचलून धरलं आणि सामान्य प्रेक्षकांनीही पहिल्या भागापेक्षा अधिक प्रेम या दुसऱ्या भागाला दिलं. या दुसऱ्या भागातील कथानकातील भावनिक बाजू प्रेक्षकांना जास्त भावली. प्रदर्शनानंतर अवघ्या काही दिवसांतच या चित्रपटाने जगभरात २०० कोटींचा आकडा पार केला आहे.

आणखी वाचा : “हॉटेल रूममध्ये बोलावलं अन् कपडे…” हॉलिवूड स्टारचा ऑस्कर विजेत्या दिग्दर्शकावर धक्कादायक आरोप

‘एबीपी न्यूज’च्या वृत्तानुसार या चित्रपटाने अवघ्या ४ दिवसांतच बॉक्स ऑफिसवर २०० कोटींचा गल्ला जमवला आहे. ‘पीएस १’ या चित्रपटाला मात्र ही कमाई करण्यासाठी तीनच दिवस लागले होते. ‘पोन्नियिन सेल्वन २’चं बॉक्स ऑफिस कलेक्शन जवळपास २१० कोटी आहे. यापैकी १२० कोटींची कमाई या चित्रपटाने भारतात केली असून परदेशातील कमाई ९० कोटींच्या आसपास आहे.

पहिल्या दिवशी २४ कोटी अन् दुसऱ्या दिवशी २६ कोटी अशी कमाई करत या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली सुरुवात केली होती. येणाऱ्या आठवड्यात हा चित्रपट ३०० कोटींचाही आकडा पार करेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. ‘पोन्नियिन सेल्वन २’ मध्ये चियान विक्रम, ऐश्वर्या राय, कार्थी, तृषा कृष्णन आणि शोभीत धूलीपाला हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. तर याचं संगीत ए आर रेहमान यांनी दिलं आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maniratnam ponniyan selvan 2 box office collection of four days avn
Show comments