एखादा अवॉर्ड शो असू दे नाही तर रिअ‍ॅलिटी शो असू दे अभिनेता मनीष पॉल हा नेहमीच सूत्रसंचालन करताना दिसतो. सध्या तो ‘इंडियाज बेस्ट डान्सर सिझन २’चे सूत्रसंचालन करताना दिसत आहे. दरम्यान एका मुलाखतीमध्ये मनिष पॉलने रिअ‍ॅलीटी शो, त्याचे करिअर आणि इतर काही गोष्टींवर वक्तव्य केले आहे.

मनिष पॉलने नुकतीच नवभारत टाइम्सला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याला, रिअ‍ॅलिटी शो विषयी अनेक प्रश्न उभे केले जातात. रिअ‍ॅलिटी शोमध्ये येण्यासाठी तुमची एक भावनिक कथा असवी लागते जेणे करुन ती दाखवून शो चालवला जाईल असे म्हटले जाते. त्यावर त्याचे मत विचारण्यात आले होते. त्यावर उत्तर देत मनिष पॉल म्हणाला, ‘मला असे अजिबात वाटत नाही. मी माझ्या शो विषयी बोलू इच्छितो इतक कोणत्याही शो विषयी मला बोलायचे नाही. हे बघा, जे स्पर्धक छोट्या गावातून आले आहेत आणि त्यांच्या संघर्षाची कथा ऐकून प्रेक्षक भावूक होणे हे साहजिक आहे. ते टीआरपी मिळवण्यासाठी केले जात नाही.’
Video: ‘हिचे चालणे पाहून डोनल्ड डकची आठवण आली’, मलायका अरोरा पुन्हा ट्रोल

पुढे मनिष म्हणाला, ‘जर एखाद्याच्या भावनिक आणि खासगी आयुष्याविषयी बोलले जात आहे तर ते टीआरपी मिळवण्यासाठी केले जात नसते. उद्या तो मुलगा संघर्ष करुन बुद्धीमत्तेच्या किंवा कौशल्याच्या जोरावर स्वत:ची ओळख निर्माण करतो तेव्हा तो कुठून आला आहे, त्याला किती संघर्ष करावा लागला या विषयी आम्ही बोलणार. आपण शाहरुख खान किंवा बच्चन सर यांच्या संघर्षाविषयी नेहमी बोलतो. सर्वांचा हेतू सारखा असतो. टीआरपी मिळवण्यासाठी कोणाचीही खोटी गरिबी किंवी लाचार आई-वडील दाखवण्याचा कोणाचा उद्देश नाही. असा कोणताही हेतू नसतो.’

Story img Loader