‘सा रे ग म प लिटील चॅम्प्स’ हा कार्यक्रम १८ जुलै पासून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या शोमध्ये सहभागी होणारी लहान मुले त्यांच्या गाण्याने अनेकांच्या मनावर जादू करताना दिसतात. येत्या भागात रामायण या मालिकेतील कलाकार हजेरी लावणार आहेत. दरम्यान अरुण गोविल यांनी शोचा सूत्रसंचालक मनीष पॉलला धनुष्यबाण कसे चालवायचे हे शिकवले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दूरदर्शन वाहिनीवरील ‘रामायण’ या अतिशय लोकप्रिय मालिकेतील अरुण गोविल (राम), दीपिका चिखलिया (सीता) आणि सुनील लहरी (लक्ष्मण) हे प्रमुख कलाकार तसेच ‘महाभारत’ मालिकेतील दुर्योधनाची भूमिका साकारणारे अभिनेता पुनीत इस्सर या चार कलाकारांनी ‘सा रे ग म प लिटील चॅम्प्स’ या शोमध्ये हजेरी लावली. दरम्यान शोचा सूत्रसंचालक मनिष पॉलने धनुष्यबाण चालवण्याची इच्छा व्यक्त केली होती.

‘रामायण’ मालिका प्रसारित होऊन तब्बल 33 वर्षांनंतरही आपण अचूक धनुष्यबाण चालवू शकतो, हे अरुण गोविल यांनी शोमध्ये दाखवून दिले आहे. त्यांचे हे कौशल्य पाहून परीक्षक आणि ज्यूरी सदस्य थक्कच झाले. तसेच मनिष पॉलला अतिशय पध्दतशीरपणे नेम धरून बाण कसा सोडायचा हे त्यांनी शिकविले आहे.

आता राम, लक्ष्मण आणि सीता कार्यक्रमात उपस्थित असल्याने प्रेक्षकांना काही रंजक किस्से निश्चितच ऐकायला मिळतील आणि बालस्पर्धकांकडून काही अप्रतिम गाणी ऐकायला मिळतील. रनिता बॅनर्जीने ‘ऐसा लगता है’ हे गाणे अतिशय तन्मयतेने सादर केले, तर झैद अलीने ‘कुन फाया कुन’ हे गीत अप्रतिमपणे सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली. एकंदरीतच ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’च्या या भागात प्रेक्षकांना अनेक मधुर गीते आणि जुन्या आठवणी ऐकायला मिळतील.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Manish paul learing how to hit target by bow and arrow avb