मलायका अरोरा जिममधील व्हिडिओ आणि फोटोंमुळे अनेकदा चर्चेत असते. अनेकदा सोशल मीडियावर लोक मलायकाच्या या चालण्याच्या स्टाइलवर टीका करताना दिसतात. यावेळी बॉलीवूडचा सर्वात मोठा अवॉर्ड शो असलेल्या फिल्मफेअर अवॉर्ड्सदरम्यान मलायकाच्या चालण्याची चर्चा झाली आणि यावेळी असं काही घडलं की उपस्थित सर्वांनाच हसू आवरणं कठीण झालं. मलायका अरोराच्या चालण्याची नक्कल करत मनिष पॉलने स्टेजवर अशी कॉमेडी केली की सगळे कलाकार पोट धरून हसले. एवढंच नाही तर स्वतः मलायकानेही यावर प्रतिक्रिया दिली.
या वर्षी झालेल्या ६७व्या फिल्मफेअर अवॉर्ड्सचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. व्हिडिओमध्ये कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत असलेल्या मनिष पॉलने सर्वप्रथम मलायका अरोराच्या ड्रेसवर टिप्पणी केली. मनिष या व्हिडिओमध्ये मलाइकाला म्हणत असल्याचे दिसत आहे, ‘मलायका पिवळा पिंपल, डिंपलच्या बाजूला बसली आहेस. तू कशी आहेस?’
आणखी वाचा-‘लायगर’ फ्लॉप झाल्यानंतर विजय देवरकोंडाची पहिली पोस्ट, म्हणाला “मी सिंगल…”
मनिष मलायका अरोराला विचारतो, “मलायका, तू कधी गोल्फ खेळली आहेस का? यावर मलायका म्हणते, “नाही, मी कधीच गोल्फ खेळले नाही.” मनीष लगेच म्हणतो, “अरे किती दुर्दैवी गोल्फ, जो तू खेळली नाहीस. कधीपासून वाट बघतंय ते मैदान ज्यावर तू चालत येशील.” असं म्हणून मनिष मलायकाप्रमाणेच वेगाने चालतो. तिची नक्कल करून दाखवतो. हे पाहून सगळे हसतात. एवढंच नाही तर मलायकाही यावर हसू लागते.
आणखी वाचा-मलायका अरोरा – अरबाज खान पुन्हा येणार एकत्र ? फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
मलायका मनिषला म्हणते, “कसं केलं मला पुन्हा दाखव.” तेव्हा मनीष म्हणतो, ‘तू पिलाटेसाठी जातेस, आम्ही तिथे बाहेर उभे असतो.” असं म्हणत मनिष पुन्हा एकदा मलायकाच्या चालण्याची नक्कल करतो. यावर, विद्या बालन, परिणीती चोप्रा, क्रिती सेनॉन, दिया मिर्झा, वरुण धवन सगळेच हसू लागतात. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.