आपला नवा चित्रपट प्रदर्शनाला सज्ज होताच काही काही कलाकारांचा उत्साह प्रचंड प्रमाणात वाढू लागतो. मनिषा केळकर हिचं हेच झाले आणि त्याच उत्साहात तिने मोहक नृत्यदेखिल सादर केले. तिचा हा चित्रपट आहे ‘माझा मी’. त्याचे निर्माते आहेत अतुल वनगे आणि निनाद वनगे, तर दिग्दर्शन केले आहे, निनाद वनगे यानी. मनिषासोबत या चित्रपटात प्रसाद ओक, समीधा गुरु, विनय आपटे आणि नंदीनी वैद्य इत्यादींच्या प्रामुख भूमिका आहेत. २३ ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रदर्शित होईल. त्याच्या ध्वनिफीत प्रकाशन सोहळ्यातील विशेष काय? तर मनिषाने आकर्षक वस्त्रात नृत्य सादर केले. खुद्द मनिषाचे यावर म्हणणे काय माहित्येय? ती सांगत होती, माझे काही महत्वाचे चित्रपट प्रदर्शित होण्याच्या टप्प्यावर माझी कारकिर्द येवून पोहचली आहे, त्याचा आपण आनंदही घ्यावा आणि ते लोकांसमोर आणावे असे मला वाटते, म्हणून मी ही संधी साधली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा