अभिनेत्री मनीषा कोईरालाने कर्करोगावर मात केली आहे. अमेरिकेत सहा महिन्यांच्या उपचारानंतर मनीषा कर्करोगमुक्त झाली आहे. ही बातमी जेव्हा मला समजली तेव्हा मला आनंदाने रडू आले, अशी प्रतिक्रिया मनीषाने दिली आहे. माझी प्रकृती पूर्वपदावर येण्यासाठी आणखी काही कालावधी लागेल. मात्र तुमच्या सदीच्छांनी माझी प्रकृती सुधारत आहे असे ४२ वर्षीय मनिषाने फेसबुकवर ‘पोस्ट’ केले आहे. तीने आपल्या चाहत्यांचेही आभार मानले आहेत.
मनीषाला अंडाशयाचा कर्करोग झाल्याचे निदान करण्यात आले होते. त्यानंतर तिच्यावर न्यूयॉर्कमध्ये उपचार सुरु होते. नेपाळमध्ये जन्मलेल्या मनिषाने १९९१ मध्ये सौदागर चित्रपटाद्वारे बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर १९४२ ए लव्ह स्टोरी, अग्निसाक्षी, बॉम्बे, खामोशी द म्युझिकल, कंपनी, भूत असे हिट चित्रपट दिले.
क्रिकेटपटू युवराज सिंगनेही जिद्दीने कर्करोगावर मात केली आहे.
मनीषा कर्करोगमुक्त
अभिनेत्री मनीषा कोईरालाने कर्करोगावर मात केली आहे. अमेरिकेत सहा महिन्यांच्या उपचारानंतर मनीषा कर्करोगमुक्त झाली आहे. ही बातमी जेव्हा मला समजली तेव्हा मला आनंदाने रडू आले, अशी प्रतिक्रिया मनीषाने दिली आहे. माझी प्रकृती पूर्वपदावर येण्यासाठी आणखी काही कालावधी लागेल. मात्र तुमच्या सदीच्छांनी माझी प्रकृती सुधारत आहे असे ४२ वर्षीय मनिषाने फेसबुकवर ‘पोस्ट’ केले आहे.
First published on: 17-05-2013 at 03:10 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Manisha koirala cancer free