कॅन्सरसारख्या आजाराला यशस्वी लढा देऊन बरी झालेली अभिनेत्री मनिषा कोइराला ही बॉलीवूडमध्ये पुर्नपदार्पण करण्यास सज्ज झाली आहे. गेल्यावर्षी ती राम गोपाल वर्माच्या ‘भूत रिटर्न्स’ या चित्रपटात दिसली होती. आता ती ‘सितारे’ या चित्रपटाद्वारे पुर्नपदार्पण करतेय.
सितारे हा चित्रपट बॉलीवूडमधील कलाकारांच्या जीवनावर आधारित आहे. ‘डून्नो वाय.. ना जाने क्यो’ या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारा कपिल शर्मा या चित्रपटाद्वारे दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत आहे. चार वर्षांपूर्वी तिने ‘एलेक्त्रा’ या मल्याळम चित्रपटाद्वारे आपल्या अभिनयाची जादू सर्वांवर चालवली होती. त्यानंतर तिने ‘मप्पीलै’ हा तमिळ चित्रपट केला होता. बॉलीवूडची ही सुंदर अभिनेत्री जुही चावलासोबत चित्रपट समीक्षकांची वाहवाही मिळालेल्या ‘आय एम’या चित्रपटातही झळकली होती.
संग्रहित लेख, दिनांक 19th Jul 2014 रोजी प्रकाशित
‘सितारे’तून मनिषा कोइरालाचे पदार्पण
कॅन्सरसारख्या आजाराला यशस्वी लढा देऊन बरी झालेली अभिनेत्री मनिषा कोइराला ही बॉलीवूडमध्ये पुर्नपदार्पण करण्यास सज्ज झाली आहे.

First published on: 19-07-2014 at 06:04 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Manisha koirala to make a comeback with sitare