रुग्णालयात उपचार घेत असलेल्या विख्यात गायक मन्ना डे यांच्या प्रकृतीत किंचित सुधारणा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. मन्ना डे यांची प्रकृती स्थिर असून, रविवारच्या तुलनेत त्यात किंचित सुधारणा झाल्याचे नारायणा ह्रदयालया रुग्णालयातील सूत्रांनी सांगितले.
मन्ना डे यांच्या छातीमध्ये संसर्ग झाल्यामुळे त्यांना शनिवारी रूग्णालयात दाखल करण्यात आले. वयाची ५० वर्षे मुंबईमध्ये राहून वेगवेगळ्या भाषांमध्ये ३५०० पेक्षा जास्त गाणी गायलेले मन्ना काही दिवसांपूर्वी बॅंगलोरमध्ये स्थायिक झाले. त्यांच्या असाधारण कार्यासाठी दादासाहेब फाळके पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले आहे. मन्नांनी गायलेले ‘जिंदगी कैसी है पहेली’…हे आनंद चित्रपटातील गीत आजही चिरतरूण आहे.

Story img Loader