बॉलिवूड अभिनेता कमाल आर खान त्याच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतो. केआरके सोशल मीडियावर त्याचं मत मांडताना दिसतो. केआरकेने बॉलिवूड अभिनेता मनोज वाजपेयी विरोधात अपमानास्पद ट्वीट केल्याचे म्हटले जाते. त्यानंतर मनोज वाजपेयीने मंगळवारी इंदौर जिल्हा न्यायालयात केआरके विरोधात तक्रार दाखल केली आहे. मनोजने तक्रार दाखल केल्याची माहिती त्याचे वकील परेश एस जोशी यांनी दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

केआरकेच्या आक्षेपार्ह ट्वीटबाबत न्यायदंडाधिकारी यांच्याकडे तक्रार सादर करण्यात आली आहे. यामध्ये केआरके विरोधात कमल ५०० अंतर्गत खटला दाखल करण्याची विनंती केली आहे. २६ जुलै रोजी मनोज विरोधात केआरकेने अपमानास्पद ट्वीट केल्याचे त्या तक्रारीत म्हटले आहे. यामुळे इंदौरमध्ये असलेल्या चाहत्यांमध्ये अभिनेत्याची प्रतिमा खराब झाली आहे, असे जोशी म्हणाले.

परेश एस जोशी यांनी पुढे सांगितलं की, मनोज स्वत: इंदौरच्या न्यायालयात मंगळवारी उपस्थित होते. त्यावेळी त्याने जबाब नोंदवला आहे. दरम्यान, केआरके विरोधात या आधी ही बॉलिवूडचा भाईजान सलमान खानने तक्रार दाखल केली होती. त्यावेळी सलमानने देखील त्याच्या तक्रारीत म्हटले होते की केआरकेने सलमान आणि त्याची कंपनी बिईंग ह्युमन विरोधात अपमानकारक ट्वीट केले.

आणखी वाचा : सलमानला विमानतळावर थांबवणाऱ्या CISF जवानावर कारवाई; मोबाइल जप्त

आणखी वाचा : ‘ममता बॅनर्जी जेहला कडेवर घेऊन काय करत आहेत…’, व्हायरल व्हिडीओवरून नेटकऱ्यांची चर्चा

‘मी आयुष्यात लुक्खा आणि फालतू नाही, म्हणून मी वेब सीरिज पाहत नाही. तुम्ही सुनील पाल यांना विचारा. पण तुम्हाला एक चरसी, गंजेडी मनोज बघायला का आवडते? आपण फक्त आवडत्या कलाकाराला पाठिंबा देऊ शकत नाही. जर तुम्हाला बॉलिवूडमध्ये चरसी गंजेडीचा तिरस्कार असेल तर तुम्ही प्रत्येकाचा तिरस्कार केला पाहिजे,’ अशा आशयाचे ट्वीट केआरकेने केले होते.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Manoj bajpayee defamation complaint against krk in a court based in indore dcp