अभिनेता मनोज बाजपेयीने अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं. त्याने त्याच्या २८ वर्षाच्या किरअरमध्ये बरेच हिट चित्रपट बॉलिवूडला दिले. रुपेरी पडद्यावर त्याने साकारलेली प्रत्येक भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडली. खरं तर बॉलिवूडचा हा अभिनेता प्रेक्षकांना आपल्यातलाच वाटतो. कोणत्याही भूमिकेसाठी जीव ओतून काम करणं आणि ती भूमिका पडद्यावर हुबेहुब साकारणं यामध्ये मनोज सरस आहे. पण त्याने आता चित्रपटांबाबत एक खंत व्यक्त केली आहे. काम न पाहता बॉक्स ऑफिसवरील फक्त आकडेच पाहिले जातात असं मनोजने म्हटलं आहे.
काय बोलला मनोज बाजपेयी?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मनोजने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान सध्याच्या चित्रपटांबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. मनोज म्हणाला, “चित्रपट कसा आहे?, चित्रपटामधील प्रत्येकाचं काम कसं आहे याबाबत सध्या कोणीच बोलायला तयार नाही. आपण सगळे फक्त १ हजार कोटी, ३०० कोटी, ४०० कोटीमध्ये फसले आहोत. हा वाद कित्येक वर्षापासून सुरु आहे आणि मला वाटतं हा वाद काही कधीच संपणार नाही.”

आणखी वाचा – “जे लोकं त्याच्यावर टीका करतात त्यांना…” तैमूरला ट्रोल करणाऱ्यांवर भडकलं खान कुटुंबीय, व्यक्त केला राग

पुढे बोलताना तो म्हणाला की, “आता चित्रपट समीक्षकही बोलतात की तुम्ही त्यांच्यासारखे चित्रपट का तयार करत नाहीत? मुख्य सिनेसृष्टीमध्ये काम करणाऱ्यांनाच हा प्रश्न विचारला जातो. मुख्य सिनेसृष्टीमध्ये काम करणाऱ्या लोकांनाच समीक्षक बरेच प्रश्न विचारत आहेत. माझ्याबाबत म्हणाल तर मी या दुनियेचा भागच नाही आहे.”

आणखी वाचा – रोहित शेट्टीच्या ‘सर्कस’मध्ये हिंदीसह मराठी कलाकारही झळकणार, पाहा चित्रपटाचं धमाल पोस्टर

मनोजने चित्रपटांच्या प्रदर्शनावरूनच स्पष्ट मत व्यक्त केलं. “फार सुरुवातीला चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित करणं फार कठीण असायचं. पण आत १ हजार करोड कमावणाऱ्या चित्रपटांमुळे हे आणखी कठीण झालं आहे. नवोदित कलाकारांसाठी ओटीटी हा उत्तम पर्याय आहे. कलाक्षेत्रात बऱ्याच विभागात काम करणाऱ्यांसाठी हे माध्यम खूप चांगलं आहे. या माध्यमामध्ये काम करणारी लोकं खूप व्यस्त आहेत तसेच खूप चांगलं काम करतात हे पाहून छान वाटतं.” असंही मनोज या मुलाखतीमध्ये बोलताना म्हणाला.

आणखी वाचा – १०० दिवसांनी रुग्णालयातून घरी परतली लेक, प्रियांका चोप्रा मात्र शूटिंगमध्ये झाली व्यस्त, पाहा फोटो

गेल्या काही दिवसांपासून बॉक्सऑफिसवर काही चित्रपटांनी कोट्यावधी रुपयांमध्ये कमाई केली. यामध्ये हिंदीमध्ये डब झालेल्या दाक्षिणात्य चित्रपटांचा अधिक समावेश आहे. आरआरआर, केजीएफ २ यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे. आरआरआर चित्रपटाने तर जगभरात कमाईच्याबाबतीत १ हजार कोटी रुपयांचा टप्पा गाठला होता.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Manoj bajpayee feels sad says nobody talks about performance and content everyone is stuck in 1000 crores 400 crores kmd
Show comments