हिंदी चित्रपटसृष्टीतील नावाजलेले अभिनेते मनोज बाजपेयी यांनी विविध पात्रं साकारून प्रेक्षकांच्या मनात वेगळी छाप निर्माण केली आहे. ‘सत्या’ चित्रपटातील भिकू म्हात्रेपासून ते ‘फॅमिली मॅन’ या ओटीटी मालिकेतील श्रीकांत तिवारीपर्यंत वेगवेगळय़ा भूमिका त्यांनी साकारल्या आहेत. केवळ चित्रपटच नव्हे तर ओटीटी माध्यमांवरही मनोज बाजपेयी यांनी त्यांच्या दमदार अभिनयामुळे प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. आता त्यांच्या झी-५ या ओटीटी माध्यमावर प्रदर्शित झालेल्या ‘सायलेन्स’ या चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रदर्शित होणार आहे. २०२१ साली प्रदर्शित झालेल्या आबान भरुचा देवहंस दिग्दर्शित या थरारपटात मनोज बाजपेयी, प्राची देसाई, अर्जुन माथूर, बरखा सिंग यांच्या मुख्य भूमिका होत्या. मनोज बाजपेयी यांनी या चित्रपटात एसीपी अविनाश वर्मा ही भूमिका साकारली आहे. एका उच्चभ्रू महिलेच्या हत्येचा छडा एसीपी अविनाश वर्मा आणि त्यांचे सहकारी कशाप्रकारे लावतात हे या चित्रपटातून दाखवण्यात आले आहे. लवकरच या चित्रपटाचा दुसरा भाग ‘सायलेन्स-२’ प्रदर्शित होत असून यामध्ये एसीपी अविनाश वर्मा नवीन प्रकरणाची उकल करताना पाहायला मिळणार आहेत.

‘सायलेन्स-२’ या आगामी चित्रपटाबद्दल बोलताना मनोज बाजपेयी म्हणाले, ‘‘मी प्रेक्षकांसाठी ‘सायलेन्स’ या चित्रपटाचा दुसरा भाग घेऊन येताना खूप उत्साही आहे. या भूमिकेसाठी मला मिळालेले प्रेम आणि कौतुकाबद्दल मी आभारी आहे. एक अभिनेता म्हणून मी नेहमीच आव्हानात्मक भूमिका साकारण्याचा प्रयत्न करत असतो. एसीपी अविनाश हीदेखील अशीच एक आव्हानात्मक भूमिका आहे. मला आशा आहे की प्रेक्षकांना हा नवीन चित्रपट नक्की आवडेल’’.

vikrant massey rajkumar hirani web sereies debut
राजकुमार हिरानींचा मुलगा ‘या’ वेब सीरिजमधून अभिनय क्षेत्रात करणार पदार्पण, ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता दिसणार खलनायकाच्या भूमिकेत
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
star pravah aboli serial new actress entry jahnavi killekar and mayuri wagh
‘स्टार प्रवाह’च्या लोकप्रिय मालिकेत २ नव्या अभिनेत्रींची एन्ट्री! जान्हवी किल्लेकरचा पहिला लूक आला समोर, तर दुसरी नायिका कोण?
tharla tar mag monika dabade baby shower ceremony
‘ठरलं तर मग’च्या सेटवर मोनिकाचं डोहाळेजेवण; मालिकेतील सर्व अभिनेत्री ऑफस्क्रीन आल्या एकत्र, पती उखाणा घेत म्हणाला…
Marathi Actor Visited Maha Kumbh Mela 2025
“प्रयागराजच्या पवित्र भूमीवर…”, महाकुंभ मेळ्याला पोहोचला ‘हा’ मराठमोळा अभिनेता; नेटकरी म्हणाले, “भाग्यवान आहेस…”
Sangeet Manapmaan Movie Review in marathi
नावीन्यपूर्ण अनुभव देणारा चित्रप्रयोग
Lagira Zhala Ji fame kiran dhane appear in Ude Ga Ambe serial
Video: ‘लाागिरं झालं जी’मधील जयडी आली परत, ‘स्टार प्रवाह’च्या ‘या’ लोकप्रिय मालिकेत झळकणार
Nitish Chavan
‘लाखात एक आमचा दादा’ फेम नितीश चव्हाणने शेअर केला ईशा संजयबरोबर व्हिडीओ; नेटकरी म्हणाले, “नाव सांगू का शीतलला?”
Story img Loader