हिंदी चित्रपटसृष्टीतील नावाजलेले अभिनेते मनोज बाजपेयी यांनी विविध पात्रं साकारून प्रेक्षकांच्या मनात वेगळी छाप निर्माण केली आहे. ‘सत्या’ चित्रपटातील भिकू म्हात्रेपासून ते ‘फॅमिली मॅन’ या ओटीटी मालिकेतील श्रीकांत तिवारीपर्यंत वेगवेगळय़ा भूमिका त्यांनी साकारल्या आहेत. केवळ चित्रपटच नव्हे तर ओटीटी माध्यमांवरही मनोज बाजपेयी यांनी त्यांच्या दमदार अभिनयामुळे प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. आता त्यांच्या झी-५ या ओटीटी माध्यमावर प्रदर्शित झालेल्या ‘सायलेन्स’ या चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रदर्शित होणार आहे. २०२१ साली प्रदर्शित झालेल्या आबान भरुचा देवहंस दिग्दर्शित या थरारपटात मनोज बाजपेयी, प्राची देसाई, अर्जुन माथूर, बरखा सिंग यांच्या मुख्य भूमिका होत्या. मनोज बाजपेयी यांनी या चित्रपटात एसीपी अविनाश वर्मा ही भूमिका साकारली आहे. एका उच्चभ्रू महिलेच्या हत्येचा छडा एसीपी अविनाश वर्मा आणि त्यांचे सहकारी कशाप्रकारे लावतात हे या चित्रपटातून दाखवण्यात आले आहे. लवकरच या चित्रपटाचा दुसरा भाग ‘सायलेन्स-२’ प्रदर्शित होत असून यामध्ये एसीपी अविनाश वर्मा नवीन प्रकरणाची उकल करताना पाहायला मिळणार आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा