आपल्या सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री अशी अमृता सुभाषची ओळख आहे. आज तिचा वाढदिवस आहे. गेली अनेक वर्षे ती नाटक, मालिका, चित्रपट, वेब सिरीज अशा विविध माध्यमांतून वैविध्यपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. तिच्या कामाचं नेहमीच कौतुक होत असतं.

‘झी ५’ने आयोजित केलेल्या एका पुरस्कार समारंभात अमृताला ‘सास बहू आचार प्रायव्हेट लिमिटेड’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार अमृता सुभाषला प्रसिद्ध अभिनेते मनोज बाजपेयी यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी मनोज बाजपेयी यांनी अमृताचं तोंडभरून कौतुक केलं.

Aishwarya Narkar
Video: “शेवटचे एकदा…”, ऐश्वर्या नारकर यांनी कोणासाठी शेअर केली पोस्ट?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
priyanka chopra rakesh roshan
“अंत्यसंस्कार सुरू असताना…”, प्रियांका चोप्राने सांगितलं ‘क्रिश’ चित्रपटासाठी तिची निवड कशी झाली, म्हणाली, “मला भीती वाटली…”
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
reelstar danny pandit got married to neha kulkarni
रीलस्टार डॅनी पंडितने केलं लग्न, त्याची ‘खऱ्या आयुष्यातील अर्धांगिनी’ पाहिलीत का?
Muramba
Video: शिवानी मुंढेकरचा मॉर्डन लूक व ‘या’ अभिनेत्याची होणार एन्ट्री; पाहा ‘मुरांबा’ मालिकेचा नवीन प्रोमो
Marathi actor Kushal Badrike funny post and share photos with wife
“आमचा संसार चालत नाही, तो…”, कुशल बद्रिकेची ‘ती’ पोस्ट चर्चेत, म्हणाला…
Marathi Actor Jaywant Wadkar Daughter business
जयवंत वाडकर यांच्या लेकीला पाहिलंत का? झाली नामांकित कंपनीची ब्रँड अँबॅसेडर, मराठी कलाकारांकडून कौतुकाचा वर्षाव

आणखी वाचा : बहुप्रतीक्षित वेब सीरिज ‘असुर सीझन २’ बद्दल मोठी अपडेट; ‘या’ महिन्यात ‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित

अमृता सुभाषने हा व्हिडीओ तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये मनोज म्हणाले, “अमृता एक उत्कृष्ट अभिनेत्री आहे. अभिनयाप्रती असलेले तिचे प्रेम, जिद्द चिकाटी यांचं कौतुक करावं तितकं कमी आहे. मी अमृताचा ‘किल्ला’ हा चित्रपट पाहिला तेव्हापासूनच मी तिच्या कामाचा चाहता झालो. मला तिचं काम खूप आवडतं, हा पुरस्कार देण्याची मला संधी मिळाली याचा मला आनंद आहे.”

पुरस्कार घेतल्यानंतर अमृतानेही उपस्थित असलेल्या लोकांचे आणि तिच्या करीअरमध्ये योगदान देणाऱ्या लोकांचे मनापासून आभार मानले. याबरोबरच मनोज बाजपेयी यांनी केलेलं कौतुक ऐकून तिला फारच बरं वाटलं हे तिने हा व्हिडिओ पोस्ट करताना लिहिलं. मनोज यांचा ‘झी ५’वर ‘सिर्फ एक बंदा काफी है’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे अन् त्याला उत्तम प्रतिसादही मिळत आहे.

Story img Loader