भोजपुरी सुपरस्टार आणि भाजपा खासदार मनोज तिवारी यांनी कन्यारत्न प्राप्त झालं आहे. ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत त्यांनी ही गुडन्यूज दिली आहे. ही गोड बातमी सांगताना त्यांनी त्यांच्या चिमुकलीचा एक फोटोदेखील शेअर केला आहे. त्यामुळे सध्या त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

‘मेरे घर आयी एक नन्ही परी… I am blessed with a baby girl…’’जय जगदंबे’ , असं म्हणत त्यांनी या चिमुकलीचं स्वागत केलं आहे. मनोज तिवारी यांना पहिली मुलगी असून सध्या ती मुंबईत शिक्षण घेत आहे.

आणखी वाचा- बेबीबंपसह अनुष्काचं खास फोटोशूट; पोस्ट शेअर करत म्हणाली…

दरम्यान, मनोज तिवारी हे लोकप्रिय भोजपुरी अभिनेता आहेत. ‘ससुराल बडा पैसावाला’ या चित्रपटातून त्यांनी कलाविश्वात पदार्पण केलं. त्यांचे धरती काहे पुकार के, भोले शंकर, जनम जनम के साथ, ऐलान, अंधा असे अनेक चित्रपट गाजले आहेत. अभिनेता असण्यासोबतच राजकीय विश्वातदेखील ते तितकेच कार्यरत आहेत. सध्या ते उत्तर पूर्व दिल्लीचे खासदारही आहेत. तसंच दिल्ली भाजपचे अध्यक्षपदही भूषवत आहेत.

Story img Loader