अभिनेता विकी कौशलने कमी कालावधीत आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. सध्या तो बऱ्याच चित्रपटांच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार, विकी सध्या यशराज फिल्म्सचा एक नवा चित्रपट करत आहे.

बॉलिवूड हंगामाने दिलेल्या वृत्तानुसार, विकी हा एक विनोदी चित्रपट करत आहे. पण अद्याप या चित्रपटाचं नाव ठरलेलं नाही. या चित्रपटात तो मिस वर्ल्ड म्हणजे मानुषी छिल्लरसोबत रोमान्स करताना दिसणार आहे. विकीचा हा पहिलाच विनोदी चित्रपट आहे.या चित्रपटाचं नाव ‘द ग्रेट इंडियन फॅमिली’ असू शकतं.

या चित्रपटात एक विचित्र परिवार दाखवण्यात येणार आहे आणि म्हणूनच या चित्रपटाचं नाव ‘द ग्रेट इंडियन फॅमिली’ असं असेल अशी चर्चा आहे. परंतु, अद्याप या चर्चांना पुष्टी मिळालेली नाही. ह्या चित्रपटाचं दिग्दर्शन विजय कृष्ण आचार्य यांचं असेल. हा चित्रपट पूर्ण झाला असला तरी तो या वर्षात प्रदर्शित होणार नाही.

विकीकडे सध्या चित्रपटांची कमतरता नाही. तो लवकरच शशांक खैतान यांच्या ‘मिस्टर लेले’ या चित्रपटात काम करणार आहे तर त्यानंतर लगेचच तो आदित्य धार यांचा ‘अश्वत्थामा’ हा चित्रपट करणार आहे. विकीच्या ‘सरदार उधम सिंग’ या चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण झालं असून तो अद्याप प्रदर्शनाच्या प्रतिक्षेत आहे. तर मानुषी सध्या अक्षय कुमारसोबत ‘पृथ्वीराज’ या चित्रपटात काम करत आहे. हा ऐतिहासिक चित्रपट असून ही यशराज फिल्म्सची निर्मिती असणार आहे. याच चित्रपटातून मानुषी बॉलिवूडमध्ये प्रवेश करणार आहे.

Story img Loader