बॉलिवूड अभिनेता आमिर खान सध्या ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपटाचा ट्रेलर आल्यापासूनच या चित्रपटाला प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणावर ट्रोल केले होते. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच हा चित्रपट सातत्याने चर्चेत होता. मात्र करोना आणि लॉकडाऊन यामुळे या चित्रपटाचे प्रदर्शन रखडले होते. मात्र येत्या ११ ऑगस्टला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. फॉरेस्ट गम्प या हॉलिवूड चित्रपटाचा हा रिमेक आहे.
लाल सिंग चड्ढा या चित्रपटात आमिर खान आणि करीना कपूर मुख्य भूमिका साकारणार आहे. दाक्षिणात्य चित्रपटाचे सुपरस्टार नागार्जुन यांचा मुलगा नागाचैतन्य या चित्रपटात झळकणार आहे. नागाचैतन्य हा आमिर खानसोबत ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. सध्या या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन केले जात आहे. या चित्रपटाचे पोस्टर, ट्रेलर, टीझर हे प्रदर्शित झाल्यापासूनच चांगलेच चर्चेत आहे. यामुळे आमिर खानला अनेकदा टीकेचा सामनाही करावा लागला आहे.
आमिर खरा देशभक्त! पत्नीने देश सोडायला सांगितला त्याने पत्नीलाच सोडले; केआरकेचे ट्वीट चर्चेत
पण नुकतंच या चित्रपटासाठी प्रमुख अभिनेत्री म्हणून आमिरने दुसऱ्या अभिनेत्रीला पसंती दर्शवली होती, असा खुलासा नुकतंच एका मुलाखतीत केल्या होत्या. मात्र काही कारणात्सव तिची या चित्रपटात वर्णी लागली नाही. त्यामुळे अखेर करीना कपूरला मुख्य अभिनेत्री म्हणून घेण्यात आले.
आमिर खान आणि करीना कपूर नुकतंच कॉफी विथ करण या कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी आमिर खानने चित्रपटाबद्दल अनेक खुलासे केले. यावेळी आमिर खान म्हणाला, “लाल सिंग चड्ढाच्या दिग्दर्शकाला एका नवीन अभिनेत्रीसोबत काम करायचे होते. त्यामुळे माझ्या डोक्यात सर्वप्रथम मानुषी छिल्लर हिचे नाव डोक्यात आले.”
पाहा व्हिडीओ –
“त्यानंतर आम्ही एका जाहिरातीमध्ये आम्ही करीना कपूर आणि मानुषी छिल्लरला एकत्र पहिले. त्यावेळी मी आणि माझ्या चित्रपटाचा दिग्दर्शक केवळ करीनालाच पाहत बसलो. ती त्यात फारच सुंदर दिसत होती”, असे आमिर म्हणाला.
काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या अक्षय कुमारच्या पृथ्वीराज हा चित्रपटाद्वारे मानुषीने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले. या चित्रपटातील तिच्या अभिनयामुळे तिला चांगली पसंती मिळाली होती. तिने मिस इंडियाचा किताब ही पटकवला आहे.