मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता आस्ताद काळे हा नेहमी काही ना काही कारणांमुळे चर्चेत असतो. तो नेहमी त्याच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखला जातो. तो अनेकदा विविध मुद्द्यांवर भाष्य करत त्याचे स्पष्ट मत मांडताना दिसतो. गेल्या काही दिवसांपासून आस्ताद काळेचा टॅटू हा चर्चेचा विषय ठरत आहे. नुकतंच त्याने हा टॅटू काढण्यामागचे कारण सांगितले आहे.
आस्ताद काळने त्याच्या उजव्या हातावरील दंडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा एक टॅटू गोंदवून घेतला आहे. हा त्याचा पहिला टॅटू आहे. या टॅटूमध्या छत्रपती शिवाजी महाराजांचा चेहरा आणि भगवा झेंडा असल्याचे पाहायला मिळत आहे. हा टॅटू त्याने काही महिन्यांपूर्वीच गोंदवून घेतला आहे. अनेकदा त्याचा हा टॅटू पाहायला मिळतो. नुकतंच ‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत त्याने हा टॅटू का काढला याबद्दल सांगितले आहे.
आणखी वाचा : “जबरदस्ती गर्भपात, शारीरिक छळ आणि पट्ट्याने मारहाण…” ‘बिग बॉस’मधल्या ‘गोल्डमॅन’ विरोधात पत्नीने केलेले गंभीर आरोप
तुझा हा टॅटू फार छान आहे. तो सतत खुणावताना दिसत आहे. हा काढण्यामागचा नेमका विचार काय होता? असा प्रश्न त्याला विचारण्यात आला होता. यावर तो म्हणाला, “यामागे काही असा विचार नव्हता. ज्याप्रकारे आपल्याला आईविषयी प्रेम असायला विचार करावा लागत नाही ना, तसंच हे आहे. यांच्याविषयी काहीच बोलू शकत नाही. आज ते होते म्हणून मी आहे. नाहीतर मी कोणीही नसतो.”
आणखी वाचा : “…अन् मी झी मराठीवरील त्या मालिकेतील एक-दोन प्रसंग भोगले” आस्ताद काळेची ‘ती’ पोस्ट चर्चेत
“मला ते डिझाईन ऑनलाईन मिळालं. त्यात झेंड्याचे मॉडिफिकेशन मी, टॅटू आर्टिस्ट आणि स्वप्नालीने मिळून केले. हे खूप छान केलं आहे. आमचा तपन मडकीकर म्हणून एक मित्र आहे. तो चित्रकार आणि प्रोफेशनल ट्रेकर आहे. त्याने हे केलं आहे. ते काढायला दीड ते दोन तास लागले आणि ते माझ्या घरी येऊन त्याने काढलंय त्यामुळे मी खूपच आरामात होतो”, असेही त्याने सांगितले.