अभिनेताअभिजीत खांडकेकर व अभिनेत्री सुखदा खांडकेकर यांची जोडी मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. अभिजीत, सुखदा सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कात राहतात. अभिजीतने महिला दिनाच्या निमित्ताने पत्नीसाठी खास पोस्ट शेअर केली आहे.
८ मार्च हा दिवस जगभरात महिला दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसाच्या निमित्ताने अभिजीतने पत्नीबरोबरच फोटो शेअर करत तिला महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. “अशी स्त्री जिने माझ्या आयुष्यात रंग भरले आहेत.” असा कॅप्शनदेखील दिला आहे. त्यावर पत्नी सुखद खांडकेकरनेदेखील कमेंट केली आहे. ‘नेहमीच’ अशा शंब्दात तिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
‘माझ्या नवऱ्याची बायको’चं येणार बॉलिवूड व्हर्जन, ‘हे’ आघाडीचे कलाकार साकारणार प्रमुख भूमिका
अभिजीत आणि सुखदा दोघे नाशिकचे असून फेसबुकच्या माध्यमातून त्यांची पहिली ओळख झाली. नाटक आणि डान्स क्षेत्रातील एका कॉमन फ्रेंडमुळे त्यांची पहिली भेट झाली. १ फेब्रुवारी २०१३ रोजी दोघे विवाहबंधनात अडकले. अभिजीतने आपल्या करियरची सुरवात आरजे म्हणून केली आहे.
अभिजीत सध्या ‘तुझेच गीत गात आहे’ या मालिकेत काम करत आहे. तर सुखदा ‘पुण्यश्लोक आहिल्याबाई’ या हिंदी मालिकेत काम करत आहे. मध्यंतरी त्या दोघांनी शेअर केलेले घराचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.