सोशल मीडियाद्वारे घराघरात पोहोचलेली रिल स्टार म्हणून सोनाली गुरवला ओळखले जाते. सोनालीचा चेहरा मॉर्फ करून सोशल मीडियावर एक अश्लील व्हिडीओ व्हायरल होत असल्याच्या प्रकरणामुळे ती चर्चेत आली आहे. या प्रकरणी तिने पोलिसात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी सोनालीने एक पोस्ट शेअर केली होती. त्यावर आता अभिनेता अभिनय बेर्डेने कमेंट केली आहे.

या प्रकरणानंतर सोनालीने इन्स्टाग्रावर एक पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये तिने व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांना जाब विचारला आहे. तसेच तिने या संपूर्ण प्रकरणावर संतापही व्यक्त केला होता.
आणखी वाचा : “ही वेळ आपल्या घरच्या मुलीवरही येऊ शकते”, प्रसिद्ध इन्स्टा स्टारची व्हायरल अश्लील व्हिडीओप्रकरणी पोलिसांत धाव, म्हणाली “लोकांना मजा मारायला…”

maha kumbha mela 2025 khoya paya kendra funny video
VIDEO : “ऐ राजू, हम ढूंढ रहे है रे बाबू…”, महाकुंभ मेळ्यात हरवलेल्या लोकांसाठी होतायत अशा घोषणा की, ऐकून पोट धरून हसाल
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Kiran Mane
“डोळ्यात पाणी आलं…”, किरण माने यांनी सांगितली ‘ती’ आठवण; म्हणाले, “माझ्यासारख्या मराठी अभिनेत्याला…”
Maharashtrachi Hasyajatra Fame prithvik Pratap share funny video with wife
Video: पृथ्वीक प्रतापला बायकोला खोचकपणे मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा देणं पडलं महागात, प्राजक्ताने थेट…; पाहा मजेशीर व्हिडीओ
a young guy express his feelings about todays marriage
Video : “आजच्या काळातला हुंडा म्हणजे…” तरुणाने सांगितली लग्नाची सत्य परिस्थिती, पुणेरी पाटीचा व्हिडीओ चर्चेत
Sameer Paranjape
‘थोडं तुझं थोडं माझं’ फेम समीर परांजपेने गायलं हटके स्टाईलने ‘नाच रे मोरा’ गाणं; नेटकरी म्हणाले, “विचार नव्हता केला…”
akshay kumar filing kite with paresh rawal
Video : ‘भूत बंगला’च्या सेटवर अक्षय कुमारने उडवली पतंग; तर परेश रावल यांनी धरली फिरकी, व्हायरल झाला व्हिडीओ
Heartwarming Message written by a young man on Makar Sankranti
Video : “माणूस तेव्हाच गोड बोलतो..” तरुण खरं बोलून गेला; नेटकरी म्हणाले, “१०० टक्के खरं आहे”

सोनाली गुरवची पोस्ट

“काही दिवसांपूर्वीचीच गोष्ट आहे. एखाद्या मुलीला ज्या गोष्टीचा नुसता विचारच असह्य होईल, नेमकी ती घटना माझ्या आयुष्यात घडली. काही मित्रांचा फोन आला कि एक अश्लील मॉर्फ विडीओ सध्या वायरल होतोय. पायाखालची जमीन सरकली. पटकन सगळं सोडून कुठेतरी निघुन जावसं वाटलं. वाईट वाईट विचार येऊ लागले. हि घटना झाल्यापासून सतत माझ्या आई वडिलांचा चेहरा माझ्या समोर यायचा. कौतुकाने बघणाऱ्या नजरा हिणवू लागल्या.

सगळं काही छान सुरु असताना एखाद वादळ येऊन सगळं उध्वस्त करून जातं. अगदी तसच वाटलं. आणि सगळ्यात जास्त वाईट तेव्हा वाटलं जेव्हा मला अश्लील मेसेज, इमेल्स आणि कमेंट्स येऊ लागल्या. लोकांना चर्चेला, मजा मारायला नवीन विषय मिळाला. खरंच एवढा वेळ आहे लोकांकडे? हि वेळ आपल्या घरच्या मुलीवरही येऊ शकते आणि मग तेव्हा आपण असेच react करणार आहोत का? याची जाणीव कशी नाही होत.

काही दिवस घाबरत कसेबसे दिवस ढकलू लागले पण नंतर घरच्यांनी आणि मित्र-मैत्रिणीनी मानसिक बळ दिलं. आणि मी पोलीस स्टेशन गाठलं. कोर्टाची आणि पोलीस स्टेशनची पायरी कधीच चढू नये असं मला नेहमी वाटत. पण त्याउलट पोलिसात गेल्या गेल्या पोलिसांनी मला सहकार्य केलं आणि लगेच हालचाली सुरु झाल्या. पोलीस झपाट्याने हे कृत्य करणाऱ्याना आणि ते पसरवायला मदत करणाऱ्या लोकांवर कारवाई करत आहेत.

मला पोलीस आणि आपल्या न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. फक्त खंत हीच आहे. कि आपला समाज एवढा विकृत कसा काय झाला? कुठून येते हि विकृती. १६-१७ वयाची लहान लहान पोरं देखील अश्लील केमेंट मेसेज करतात तेव्हा चीड येते. स्वतःच्याच समाजात वावरण्याची भीती वाटते. पण आता ठरवलं आहे मी जशी हि घटना झाल्यानंतरही माझ्या चाहत्यांचं, हितचिंतकांचं मनोरंजन करणं थांबवलं नाही त्यापेक्षा दुपटीने मेहनत करून तुमचं मनोरंजन करायचा प्रयत्न करत राहीन. लवकरच अश्लीलता नसलेल्या, जज न करणाऱ्या समाजात मी आणि माझ्यासारख्या अनेक मुली बागडतील हीच स्वामींचरणी प्रार्थना.” असे तिने या पोस्टमध्ये म्हटले आहे.

आणखी वाचा : “गुन्हेगारांना लवकरच शिक्षा होणार…” व्हायरल अश्लील व्हिडीओप्रकरणी मराठमोळ्या इन्स्टा स्टारच्या नव्या पोस्टने वेधलं लक्ष

सोनालीच्या या पोस्टवर अभिनेता अभिनय बेर्डेने कमेंट केली आहे. ‘तुला देव बळ देवो’ अशी कमेंट अभिनयने केली आहे. सध्या सोनालीची ही पोस्ट व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे अनेक कलाकारांनी तिला याबद्दल पाठिंबाही दिला आहे.

नेमकं प्रकरण काय?

सोनाली गुरव ही सोशल मीडियाद्वारे प्रसिद्ध झाली. काही दिवसांपूर्वी सोनाली गुरवचा एक अश्लील व्हिडीओ व्हायरल झाला होता. याप्रकरणी सोनालीने पोलिसात तक्रार दाखल केली होती. सोनाली गुरवने दाखल केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. भारतीय दंड संहिता कलम ५००, माहिती आणि तंत्रज्ञान कायदा कलम ६५,६६ सी, ६७ ए या कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. हा व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.

Story img Loader