अभिनेता आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कोठारे हे सध्याच्या अतिशय लोकप्रिय कपलपैकी एक आहेत. मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोडी म्हणून त्यांना ओळखले जाते. ते दोघेही सोशल मीडियावर कायमच चर्चेत असतात. ‘परफेक्ट फॅमिली’ आणि ‘परफेक्ट कपल’असलेल्या या दोघांमध्ये गेल्या काही दिवसांपासून बिनसलं असल्याची चर्चा सुरु आहे. विशेष म्हणजे उर्मिला ही कोठारे कुटुंबातून विभक्त राहत असल्याची चर्चाही सुरु आहे. दरम्यान या सर्व चर्चांवर नुकतंच आदिनाथने मौन सोडले आहे.

उर्मिला आणि आदिनाथ कोठारे यांना मराठी सिनेसृष्टीतील परफेक्ट कपल म्हणून ओळखले जाते. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात काही तरी मतभेद असल्याची चर्चा सर्वत्र सुरु आहे. आदिनाथ कोठारेची प्रमुख भूमिका असलेल्या चंद्रमुखी या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये उर्मिला कुठेही दिसली नाही. तसेच तिने यासंदर्भात एकही पोस्ट शेअर केलेली नव्हती. तर काही दिवसांपूर्वी उर्मिलाचा वाढदिवस झाला. त्यावेळीही त्याने तिच्यासाठी काहीही पोस्ट शेअर केली नव्हती.

Gashmeer Mahajani
“परत तिच्या कुशीत…”, गश्मीर महाजनी आईबद्दल बोलताना म्हणाला, “घरी दोन लहान मुलं…”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Scientist Rahul Damale selected for Netaji Subhash ICAR International Fellowship
वडील तिसरी उत्तीर्ण तर आई निरक्षर, मुलगा शास्त्रज्ञ झाला, आता परदेशी शिक्षणासाठी निवड
shetkari kamgar paksh break in alibaug
मामाच्या मनमानीला कंटाळून भाचे भाजपच्या वाटेवर; अलिबागमधील ‘शेकाप’च्या पाटील कुटुंबात फूट
hasan mushrif ajit pawar (1)
“…तर अजित पवार धनंजय मुंडेंना सोडणार नाहीत”, हसन मुश्रीफांचं वक्तव्य
MVA rift grows as Shiv Sena ubt announces independent poll strategy
महाविकास आघाडीत धुसफुस; शिवसेनेच्या स्वबळाच्या नाऱ्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादीचीही स्वतंत्र लढण्याची तयारी
ramesh mantri
पडसाद : रमेश मंत्री यांची निवड त्यांच्या साहित्यिक कारकीर्दीच्या आधारेच!
devendra fadnavis sanjay raut
“संजय राऊत रिकामटेकडे…मी नाही”, देवेंद्र फडणवीसांचा टोला

उर्मिला आणि आदिनाथ कोठारे यांच्यात बिनसलं? चर्चांना उधाण

विशेष म्हणजे तब्बल १२ वर्षांनी उर्मिलाही छोट्या पडद्यावर कमबॅक करताना दिसत आहे. सध्या तिच्या ‘तुझेच गीत गात आहे’ या मालिकेच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. मात्र तिनं कमबॅक करण्यासाठी ‘कोठारे’ व्हिजन या आपल्या होम प्रॉडक्शनची नाही तर दुसऱ्या प्रॉडक्शनची निवड केली. या सर्व घटनांनतरच या चर्चांना उधाण आले.

पण नुकतंच या संपूर्ण प्रकरणावर आदिनाथ कोठारेने मौन सोडले आहे. त्याने एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. “उर्मिला आणि माझ्यात सगळं काही छान सुरु आहे. आम्ही एकमेकांसोबत खूश आहोत”, असे त्याने म्हटले.

Loksatta Exclusive: आनंद दिघेंच्या भूमिकेत प्रसाद ओकला पाहताच उद्धव ठाकरे म्हणाले, “आता बाळासाहेब….”

“उर्मिला आणि आमच्या नात्याबद्दल या सर्व चुकीच्या बातम्या पसरवल्या जात आहेत. सध्या आम्ही दोघेही शूटींगमध्ये व्यस्त आहोत. त्यामुळे एकमेकांसोबत दिसत नाही. मात्र आमच्या दोघात सगळं छान सुरु आहे. आम्ही एकमेकांसोबत फार खूश आहोत. माझ्या आणि उर्मिलाबद्दल अशा अफवा पसरवणाऱ्या आणि चर्चा करणाऱ्यांना मी महत्त्व देत नाही”, असे आदिनाथ म्हणाला.

दरम्यान आदिनाथ या संपूर्ण प्रकरणावर स्पष्टीकरण दिलं असलं तरी उर्मिलाने यावर काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. अनेकदा तिने या प्रश्नावर बोलण्यास टाळाटाळ केल्याचेही दिसत आहे. त्यामुळे त्या दोघांचे नेमकं काय सुरु आहे? त्या दोघांमध्ये नक्की वाद सुरु आहेत का? असे अनेक प्रश्न चाहत्यांना पडले आहे. तसेच अनेकांना हे ऐकल्यावर थोडा धक्काही बसला आहे.

Story img Loader