नाटक, मालिका, चित्रपट आणि वेब सीरिज अशा विविध माध्यमांतून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा मराठमोळा अभिनेता म्हणजे अमेय वाघ. उत्तम अभिनय शैली आणि योग्य कथानकांची निवड यामुळे अमेयचा चाहतावर्ग अफाट आहे. अमेय हा लाखो प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतो. ‘दिल दोस्ती दुनियादारी’, ‘फास्टर फेणे’ किंवा ‘अमर फोटो स्टुडिओ’ यासारख्या अनेक चित्रपटांसह मालिकांमधून त्याने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. सध्या अमेय हा ‘मी वसंतराव’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. नुकतंच त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्याची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे.
अमेय वाघ हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. नुकतंच अमेयने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत अमेय हा गाडीत बसून ‘मी वसंतराव’ या चित्रपटातील एक गाणे गुणगुणत असल्याचे दिसत आहे. अतिशय लयबद्घ स्वरुपात, चालीत आणि सुरात अमेय हे गाणे म्हणत आहे. विशेष म्हणजे तो एखाद्या शास्त्रीय गायकाप्रमाणे गाणे गात असताना हातवारेही करत आहे.
“आमचा चित्रपट प्रदर्शित होऊन…”, अभिनेत्री अनिता दातेची फेसबुक पोस्ट चर्चेत
या व्हिडीओला अमेय दिलेले कॅप्शन फारच हटके आहे. “कच्चा बदाम खाऊन मला अशी अक्कल आली की मराठी गाण्यांवरच चांगले reels बनवता येतात! “मी वसंतराव” चा तिसरा आठवडा सुरु! लवकर बघा!”, असे कॅप्शन त्याने या व्हिडीओला दिले आहे. त्याचा व्हिडीओ आणि ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे.
दरम्यान जिओ स्टुडिओज प्रस्तुत ‘मी वसंतराव’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करताना दिसत आहे. पंडित वसंतराव देशपांडे हे एक चतुरस्त्र व्यक्तिमत्व. शास्त्रीय संगीतानं नटलेली एखादी बंदिश असो, वा चित्रपटातील भावगीत असो, अथवा नाट्यगीत असो या प्रत्येक संगीत प्रकारावर वसंतरावांची गायकी आपला ठसा उमटवून जाते. वसंतरावांची सांगितिक कारकीर्द अनेकांना माहित आहे. पण ‘मी वसंतराव’ या चित्रपटाच्या निमित्ताने त्यांचे वैयक्तिक आयुष्य, सांगितिक प्रवास प्रेक्षकांना अनुभवायला मिळत आहेत.
या चित्रपटाची निर्मिती चंद्रशेखर गोखले, दर्शन देसाई, निरंजन किर्लोस्कर यांनी केली आहे. निपुण अविनाश धर्माधिकारी दिग्दर्शक आहेत. या चित्रपटात राहुल देशपांडे, अनिता दाते, पुष्कराज चिरपुटकर, कौमुदी वालोकर आणि अमेय वाघ यांच्या प्रमुख भूमिका आहेत. यात अमेय वाघने दिनानाथ मंगेशकर यांची भूमिका साकारली आहे.