मराठी मनोरंजनसृष्टीत टेलिव्हिजन, चित्रपट आणि नाटक अशा तीनही माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर स्वतःच्या अभिनयाचा ठसा उमटवणारे अभिनेते आनंद अभ्यंकर यांचं निधन होऊन आज १० वर्षं लोटली. आजही मराठी मनोरंजनसृष्टीचा इतिहास त्यांच्या नावाशिवाय अधुराच आहे. आनंद अभ्यंकर यांच्या ‘असंभव’, ‘मला सासू हवी’ या मालिका चांगल्याच गाजल्या. यापैकीच एका मालिकेचे चित्रीकरण पूर्ण पुण्याला परतत असताना मुंबई-पुणे महामार्गावर त्यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला होता.

या अपघातातच त्यांचं आणि त्यांच्याबरोबर असलेले सद्गृहस्थ आनंद पेंडसे यांचेही निधन झाले. आज आनंद अभ्यंकर यांच्या १० व्या स्मृतीदिनाबद्दल त्यांची मुलगी सानिका अभ्यंकर हिने एक अत्यंत भावूक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. सानिकाची ही पोस्ट पाहून चाहतेही भावूक झाले आहे.

Maharashtrachi Hasyajatra Fame Prasad Khandekar share special post for wife
“चाळीतून वन रुम किचनमध्ये…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरने बायकोसाठी केली खास पोस्ट; म्हणाला, “तुझ्या साथीने…”
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Aishwarya Narkar
Video: “शेवटचे एकदा…”, ऐश्वर्या नारकर यांनी कोणासाठी शेअर केली पोस्ट?
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
Marathi actress Hruta Durgule and Lalit Prabhakar new movie coming soon
“तू मला आधी का नाही भेटलास?” म्हणत हृता दुर्गुळेने ‘या’ मराठी अभिनेत्याबरोबरचा फोटो केला शेअर
Son gifted father Mercedes on his 65th birthday emotional video goes viral on social media
VIDEO: “आयुष्यात फक्त एवढं यशस्वी व्हा” मुलानं वडिलांच्या ६५व्या वाढदिवसाला गिफ्ट केली मर्सिडीज कार; वडिलांची रिअ‍ॅक्शन पाहाच
salman khan mother danching with helan
Video : सलमान खानच्या आईने हेलन यांच्याबरोबर धरला ठेका; उपस्थितही पाहतच राहिले, व्हिडीओ होतोय व्हायरल
Chhoti Tara Tadoba , Tadoba Chhoti Tara Tiger Calf Video, Chhoti Tara Tiger,
VIDEO : ‘तिने’ सहावेळा मातृत्त्वाचा अनुभव घेतला, पण आता…

आणखी वाचा : बातमी चार्ल्स शोभराजच्या सुटकेची, फोटो रणदीप हुड्डाचा; अभिनेता ट्वीट करत म्हणाला, “ही प्रशंसा की..”

या पोस्टमध्ये तिने तिच्या वडिलांबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत. शिवाय याबरोबर तिने आनंद यांच्या फोटोंचा एक छान व्हिडिओदेखील जोडला आहे, मागे लता मंगेशकर यांच्या आवाजातील ‘एक प्यार का नगमा है’ हे गाणं सुरू आहे. सानिकाची ही पोस्ट पाहून आनंद अभ्यंकर यांच्या चाहत्यांनी कॉमेंटमध्ये त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

सानिकाने तिच्या पोस्टमध्ये लिहिलं की, “बाबा तुमच्याशिवाय १० वर्षं गेली यावर विश्वासच बसत नाही. तुम्ही आजही आमच्या बरोबर आमच्या मनात, आमच्या हृदयात, आमच्या बोलण्यात आमच्या हसण्यात आणि अश्रूंमध्ये आहात. पण आज मला या गोष्टीची खंत वाटते की मी आता तुम्हाला आजोबा म्हणून बघू शकणार नाही. तुम्ही जर इथे असता तर तुम्ही तुमच्या नातीचे प्रचंड लाड पुरवले असते. आम्हाला दरदिवशी तुमची प्रकर्षाने आठवण येते. तुमचा वारसा आजही चिरंतन आहे आणि सदैव राहील.” सानिकाच्या पोस्टवर सुकन्या मोने, तेजस्विनी पंडित, स्पृहा जोशी अशा बऱ्याच सेलिब्रिटीजनी कॉमेंट केल्या आहेत. आनंद यांनी ‘सरकारनामा’, ‘चेकमेट’, ‘मातीच्या चुली’, ‘वास्तव’सारख्या चित्रपटातही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या.

Story img Loader