‘सैराट’, ‘झुंड’सारखा चित्रपट देणारा मराठी दिग्दर्शक नागराज मंजुळे हा एक उत्तम अभिनेतासुद्धा आहे. ‘नाळ’सारख्या चित्रपटातून त्याने त्याचं अभिनय कौशल्यसुद्धा दाखवलं आहे. आता पुन्हा एकदा नागराज अभिनय करताना दिसणार आहे. ‘घर बंदूक बिर्याणी’ या चित्रपटात नागराज एका पोलिस अधिकाऱ्याची भूमिका निभावत आहे. या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा होत आहे.

नुकतंच अकोला येथे भरलेल्या अखिल भारतीय गझल संमेलनात नागराज मंजुळेने हजेरी लावली. उद्घाटन सोहळा नागराजच्या हस्ते पार पडला आणि तेव्हा नागराजने त्याच्या आयुष्यातील काही आठवणींना उजाळा दिला. तरुण असताना नागराजने पोलिस प्रशिक्षणात सहभाग घेतला होता आणि त्यासाठी तो अकोल्यात आला होता, पण पोलिस प्रशिक्षण अर्धवट सोडून नागराजने धूम ठोकल्याचंही कबूल केलं.

Navra Maza Navsacha 2 loksatta latest news
पुन्हा एकदा मनोरंजनाचा प्रवास, ‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपटातील कलावंत ‘लोकसत्ता’ कार्यालयात
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
renukaswamy offere to pavithra gowda live in relationship
Renukaswamy Case Chargesheet: ‘लिव्ह इनमध्ये ये, महिन्याला १० हजार देतो’, चाहत्याची अभिनेत्रीला ऑफर; हत्या होण्यापूर्वी पाठवले गुप्तांगाचे फोटो
chhichhore movie has 5 years complete shraddha kapoor share her memories on social media
‘छिछोरे’ सिनेमाला पाच वर्षे पूर्ण! सुशांतबरोबरच्या ‘त्या’ व्हिडीओद्वारे श्रद्धा कपूरचा जुन्या आठवणींना उजाळा, म्हणाली…
Renukaswamy murder case photo
Pavithra Gowda: ‘खून होण्याआधी तो हात जोडून…’, अभिनेता दर्शनच्या अत्याचारामुळे मृत चाहत्याचे पालक हादरले
bombay hc refuses to direct cbfc to release certification copy to kangana ranaut emergency
Emergency Movie : कंगनाच्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर; प्रमाणपत्र देण्याचे आदेश देण्यास उच्च न्यायालयाचा नकार
shraddha kapoor new house set become akshay kumar neighbour in juhu on rent
कोट्यवधींची मालकीण असून श्रद्धा कपूर राहणार भाड्याने; जुहूमध्ये ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याच्या शेजारी घेणार फ्लॅट
Murder Accused Actor Darshan gets VIP treatment in jail
Actor Darshan In Jail : तुरुंगात अभिनेता दर्शनला विशेष वागणूक; मुख्य अधीक्षकांसह ९ तुरुंग अधिकारी निलंबित

आणखी वाचा : रितेश-जिनिलीयाच्या ‘वेड’ची जादू कायम; ९ व्या दिवशी चित्रपटाची रेकॉर्ड ब्रेकिंग कमाई

याविषयी नागराज म्हणाला, “२५ वर्षांपूर्वी मी सोलापूरमध्ये पोलिसांत भरती झालो, पुढील प्रशिक्षण अकोल्यात होतं. इथल्या पोलिस प्रशिक्षण केंद्रात मी १३ दिवस राहिलो. माझं मन इथे लागत नव्हतं त्यामुळे मी हे प्रशिक्षण अर्धवट सोडून पळ काढला.” प्रशिक्षण केंद्रात नागराज बराच अस्वस्थ असायचा, एके दिवशी त्याला त्याच्या गावाची, तालुक्याची आठवण येऊ लागली. अखेर त्याने हे क्षेत्र सोडून कलाक्षेत्रात यायचं नक्की केलं. नागराजच्या मित्रांनीही त्याच्या या निर्णयाला पाठिंबा दिला अन् अशा पद्धतीने नागराज पोलिस प्रशिक्षण अर्धवट सोडून परत आला.

नागराजनंतर त्याचा लहान भाऊही पोलिसांत भरती झाला. मात्र त्याने हे प्रशिक्षण पूर्ण केलं. यामुळेच आकोल्याशी नागराजचं एक वेगळं नातं आहे असंही त्याने स्पष्ट केलं. यावेळी नागराज खूप भावूक झाला. याबरोबरच अकोल्याच्या पोलिस प्रशिक्षण केंद्राला भेट देण्याची इच्छाही नागराजने व्यक्त केली. ‘घर बंदूक बिर्याणी’ या चित्रपटाची सगळेच आतुरतेने वाट पहात आहेत. नागराजबरोबर यात सयाजी शिंदे आणि आकाश ठोसरही मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.