मराठी मनावर अधिराज्य गाजवणारा सुपरस्टार म्हणून अभिनेता अंकुश चौधरीला ओळखले जाते. सध्या मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचा अभिनेता म्हणून तो कार्यरत आहे. दमदार अभिनय कौशल्याच्या जोरावर अंकुशने त्याची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अंकुश चौधरीप्रमाणेच त्याची पत्नी दीपा परब ही गुणी अभिनेत्री आहे. आज ३१ ऑक्टोबर रोजी तिचा वाढदिवस असतो. तिच्या वाढदिवसानिमित्त तिला अनेकजण शुभेच्छा देत आहेत. नुकतंच अंकुशने दीपाबद्दलची एक पोस्ट शेअर केली आहे

अंकुशची पत्नी दीपा परब ही ‘तू चालं पुढं’ या मालिकेत झळकताना दिसत आहे. झी मराठीवरील या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे. तर दुसरीकडे काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेला दगडी चाळ २ हा चित्रपट टीव्हीवर प्रक्षेपित करण्यात आला. यानिमित्ताने अनेक ठिकाणी प्रमोशनचे होर्डिंग्स लावण्यात आले होते. याबद्दल अंकुश चौधरीने एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात त्याने पत्नी दीपालाही टॅग केले आहे.
आणखी वाचा : “माझ्या मित्राचा संसार…” केदार शिंदेंनी अंकुश चौधरीच्या पत्नीसाठी केलेली ‘ती’ पोस्ट चर्चेत

Maharashtrachi Hasyajatra Fame Prasad Khandekar share special post for wife
“चाळीतून वन रुम किचनमध्ये…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरने बायकोसाठी केली खास पोस्ट; म्हणाला, “तुझ्या साथीने…”
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Groom dance in his own wedding function with his friends on zapuk zupuk song funny video goes viral on social media
“तुझ्या चिकण्या रुपड्याला मन चोरुन पाहतंय गं” नवरदेवानं मित्रांसोबत बायकोसाठी केला जबरदस्त डान्स; VIDEO झाला व्हायरल
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
Marathi actress Hruta Durgule and Lalit Prabhakar new movie coming soon
“तू मला आधी का नाही भेटलास?” म्हणत हृता दुर्गुळेने ‘या’ मराठी अभिनेत्याबरोबरचा फोटो केला शेअर
Anju Bhavnani
दीपिका-रणवीरची लेक झाली तीन महिन्यांची; आजी अंजू भवनानी यांनी नातीसाठी केली ‘ही’ गोष्ट, पाहा फोटो
siddharth chandekar took special ukhana for wife mitali
“मितालीचं नाव घेतो अन् गिफ्ट करतो…”, सिद्धार्थ चांदेकरने बायकोसाठी घेतला हटके उखाणा, पाहा व्हिडीओ
Man who left home after wife death returns home after 15 years
पत्नी विरहातून घर सोडले, १५ वर्षानंतर कुटुंबात परतला; नागपुरातील मेयो रुग्णालयात…

अंकुश चौधरीने शेअर केलेल्या या व्हिडीओत प्लाझा चित्रपटगृह ते दादरच्या टिळक ब्रीज परिसर पाहायला मिळत आहे. यात त्याने त्याच्या दीपाच्या तू चालं पुढं या मालिकेचे लावलेले होर्डिंग आणि त्याच्या दगडी चाळ २ या चित्रपटाचे लावलेले होर्डिंग पाहायला मिळत आहे. याला त्याने फार हटके कॅप्शन दिले आहे.

“शिवाजी मंदीर नाट्यगृहापासून सुरु झालेला दोघांचा प्रवास ते प्लाझाला प्रिमियर झालेले आमचे चित्रपट आणि आता या दादरच्या टिळक ब्रिज वर दोघांचेही एकाचवेळी होर्डिंग्ज.. कायम लक्षात राहाणारा क्षण… आम्ही एकमेकांना नेहमी सांगत आलोय…. “तू चाल पुढं“…”, असे अंकुश चौधरीने या पोस्टच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे.

आणखी वाचा : ऐतिहासिक पात्र, बोल्ड फोटो अन् रोखठोक स्वभाव असलेल्या स्नेहलता वसईकरबद्दल माहितीये का?

अंकुश चौधरी-दीपा परबची लव्हस्टोरी

अंकुश चौधरी आणि दीपा हे दोघेही परळच्या एमडी कॉलेजमध्ये शिक्षण घेत होते. त्यावेळी त्या दोघांची पहिली भेट झाली. महाविद्यालयात असतानाच त्यांची मैत्री झाली आणि कालांतराने त्याचे प्रेमात रुपांतर झाले. ते दोघेही एकमेकांना डेट करु लागले. ‘ऑल द बेस्ट’ या नाटकात दिपा परब आणि अंकुश चौधरी यांनी एकत्र काम केले आहे. या नाटकाच्या रंगीत तालीम होत असतं. त्या तालीममुळे त्या दोघांमधील नातं घट्ट झाले.

तब्बल १० ते १२ वर्षे एकमेकांना डेट केल्यावर त्या दोघांनी २००७ मध्ये लग्न केले. दिपा व अंकुश यांना प्रिन्स नावाचा मुलगा आहे. मुलगा झाल्यानंतर दीपाने काही काळ सिनेसृष्टीतून ब्रेक घेतला होता. मात्र आता ती पुन्हा एकदा सिनेसृष्टीकडे वळली आहे.

Story img Loader