बॉलिवूडप्रमाणेच मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकार हे कायमच चर्चेत असतात. ते सोशल मीडियावर नेहमी विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसतात. गेल्या काही दिवसांपासून अनेक मराठी कलाकार नवं घर, गाडी खरेदी करत असल्याचे पाहायला मिळत आहे. मराठी सिनेसृष्टीतील सर्वांचा लाडका अभिनेता म्हणून अंशुमन विचारेला ओळखले जाते. त्याच्या अभिनयाचे कायमच कौतुक केले जाते. काही दिवसांपूर्वीच अंशुमनने नवीन गाडी खरेदी केली आहे. मात्र यामुळे त्याला अनेकांनी ट्रोल केले होते. अखेर अंशुमन विचारेची पत्नी पल्लवी हिने यावर सडेतोड उत्तर दिले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अंशुमन विचार याने काही दिवसांपूर्वी नवीन गाडी खरेदी केली होती. या गाडीचा एक व्हिडीओ त्याने युट्यूबवर शेअर केला होता. यात त्याने लेकीचा उत्साह, गाडीची पूजा करतानाचे क्षण कॅमेऱ्यात कैद केले आहेत. या व्हिडीओ खाली अनेकांनी त्याला शुभेच्छा दिल्या होत्या. तर अनेकांनी त्याने नवीन गाडी घेतल्यावरुन त्याला ट्रोलही केले.
आणखी वाचा : “खरं सांगायचं तर…” छगन भुजबळांनी सांगितले गळ्यात नेहमी मफलर परिधान करण्याचे कारण

अंशुमन विचारे याच्या व्हिडीओवर एका नेटकऱ्याने त्याला ट्रोल करणारी कमेंट केली होती. तुम्ही नवीन गाडी, नवीन घर कसे काय खरेदी करता? आम्ही तुम्हाला फार क्वचित काम करताना पाहतो, असा प्रश्न त्या नेटकऱ्याने विचारला. त्यावर त्याची पत्नी पल्लवी विचारे हिने त्या नेटकऱ्याला चांगलेच खडे बोल सुनावले आहेत.

“माझा नवरा गेल्या ३० वर्षांपासून काम करत आहे. त्याने आतापर्यंत खडतर प्रवास केला आहे. त्याच्या या प्रवासाबद्दल आपण विचारही करु शकत नाही, म्हणूनच….” असे सडेतोड उत्तर अंशुमन विचारेच्या पत्नीने दिले आहे. त्याचा एक स्क्रीनशॉट त्याने फेसबुकवर पोस्ट केला आहे. शुभेच्छा न देणाऱ्या जवळ जवळ सर्वांना हाच प्रश्न पडलाय काय, युट्यूब व्हिडीओला आलेली कमेंट आणि त्यावर माझ्या एकमेव बायकोचं उत्तर, असे कॅप्शन त्याने या फोटोला दिले आहे.

आणखी वाचा : “यांना कामधंदे नाहीत का?” अंथरुणाला खिळून असलेल्या वृत्तांवर वर्षा दांदळेंनी व्यक्त केला संताप

दरम्यान अंशुमन विचारे हा कायमच विविध कारणांमुळे चर्चेत असतो. त्याने त्याच्या अभिनयाने सर्वांचीच मनं जिंकली आहे. त्याने आतापर्यंत श्वास, पोस्टर बॉईज, विठ्ठला ​शप्पथ​ अशा अनेक चित्रपटात काम केले आहे. त्याबरोबर तो विविध मालिकांमध्येही झळकला आहे. तसेच त्याने मोर्चा चित्रपटाद्वारे गायनाच्या क्षेत्रात पाऊल ठेवले आहे.