आर्यन खान प्रकरणामुळे एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे चांगलेच चर्चेत आले आहेत. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी वानखेडेंवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. त्यानंतर समीर वानखेडेंची पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकरने पत्रकार परिषद घेत त्यांच्यावरील सर्व आरोप बिनबुडाचे असल्याचं म्हणत नवाब मलिक यांना चांगलचं सुनावलं आहे.
नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंचा जन्मदाखला आणि पहिल्या लग्नाचा फोटो पोस्ट करत त्यांच्या खासगी आयुष्यावरही निशाणा साधण्यास सुरुवात केली होती. मात्र क्रांतीने “आज काल बायका पण असं वागत नाहीत. हे किचनमधील पॉलिटिक्स, चोमडेपणा केल्यासारखं आहे.” असं म्हणत त्यांना प्रत्युत्तर दिलं. दरम्यान क्रांतीने तिला महाराष्ट्रासह देशभरातून समर्थनाचे मेसेज येत आहेत असं म्हंटलं असलं तरी अद्याप एकही मराठी अद्याप क्रांतीच्या पाठिंब्यासाठी पुढे का येत नाही अशा चर्चा सुरु होत्या.अशातच अभिनेता आरोह वेलणकर यांनी हाच प्रश्न उपस्थित करत क्रांतीला सोशल मीडियावरून जाहीर पाठींबा दिला आहे.
आरोह वेलणकरने एक ट्वीट केलं आहे. यात तो म्हणाला, “क्रांती मला खरंच आश्चर्य वाटतंय की आपल्या मराठी इंडस्ट्रीमधील एकही मित्र तुझ्या पाठींब्यासाठी उघडपणे समोर आलेला नाही. सोशल मीडियावरून सुरु असलेली तुझ्या कुटुंबाविरोधातील ही पीआर मोहीम अस्वस्थ करणारी आहे. मला माहित आहे आपण खूप चांगले मित्र नाही फक्त ओळखीचे आहोत. मात्र तरीही माझा तुला पूर्ण पाठिंबा आहे.” असं म्हणत आरोहने क्रांतीला जाहीर पाठिंबा दिला. क्रांतीला सोशल मीडियावरून पुढाकार घेत पाठिंबा देणारा आरोह पहिला मराठी अभिनेता आहे.
दरम्यान क्रांती रेडकरने पत्रकार परिषद घेत समीर वानखेडेंवर आरोप करणाऱ्यांवर निशाणा साधला आहे. यावेळी सोशल नेटवर्किंगवर आम्हाला ठरवून टार्गेट केलं जात असल्याचा आरोप क्रांती रेडकर आणि जास्मिन यांनी केला. रोज आम्हाला शिव्या दिल्या जातात, वाईट बोललं जातं असल्याचे प्रकार आमच्यासोबत सोशल नेटवर्किंगवर सुरु आहेत. धक्कादायक बाब म्हणजे हे ओपनली होत आहे आणि आम्ही काहीच करु शकत नाही, असं क्रांती म्हणाली.
‘इंडस्ट्रीमधील प्रत्येसोतुरुंगात जातील…’, मिका सिंग संतापला
तसचं “आम्ही पोस्टवर कमेंट करणाऱ्यांचे स्क्रीनशॉर्ट घेतलेत. ती सर्व खोटी अकाऊंट असल्याचं दिसत आहे. कोणती तरी पीआर यंत्रणा आहे जी हे काम करतेय. कोण डेथ थ्रेट देतात याचे स्क्रीनशॉर्ट आम्ही संबंधित यंत्रणांकडे दिले आहेत. जो कोण धमकावण्याचा प्रयत्न करतोय त्याचा पर्दाफाश होईल, असा विश्वास क्रांतीने व्यक्त केलाय. व्यक्त केलाय.