टी २० विश्वचषकातील भारत आणि इंग्लंड यांच्या दरम्यान दुसरा उपांत्य फेरीचा सामना खेळला गेला. भारतीय संघाने सांघिक कामगिरीच्या जोरावर १६८ धावसंख्या केली. या धावांचा पाठलाग करण्यासाठी इंग्लंडने आपल्या दोन्ही सलामीवीरांच्या शानदार खेळाचा जोरावर भारताचा तब्बल १० गडी राखत दारुण पराभव केला. यामुळे त्यांची अंतिम फेरीत जागा निश्चित केली.‌ याबरोबरच भारतीय संघाचे दुसऱ्यांदा टी २० विश्वविजेतेपदाचे स्वप्न अधुरे राहिले. यानंतर अनेकजण विविध पोस्ट शेअर करताना दिसत आहेत. नुकतंच एका मराठमोळ्या अभिनेत्याने यावर खोचक प्रतिक्रिया दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मराठी अभिनेता आरोह वेलणकरने हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. तो अनेकदा विविध चर्चेत असलेल्या मुद्द्यांवर भाष्य करत असतो. आरोह हा ट्विटरवर कायमच सक्रीय असतो. नुकतंच आरोहने भारत विरुद्ध इंग्लंड या सामन्याबद्दल एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमुळे तो चर्चेत आला आहे.
आणखी वाचा : माशाचे कालवण, कोळंबीचा रस्सा, नानांच्या हाताला चवच भारी! प्रसिद्ध अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत 

“जसं एका समालोचकाने म्हटलं, “इंग्लंडच्या दमदार खेळापुढे भारतीय टीम सामान्य वाटत होती” भारताची टुकार खेळी आणि इंग्लंडची दमदार फलंदाजी”, असे ट्वीट आरोह वेलणकरने केले आहे. त्याचे हे ट्वीट सध्या चांगलेच व्हायरल होत आहे.

आणखी वाचा : IND vs ENG: लाजिरवाणा पराभव! भारतावर इंग्लंडचा १० विकेट्सने विजय; अंतिम फेरीत इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान सामना रंगणार

दरम्यान इंग्लंडच्या दोन्ही सलामीवीरांनी यावेळी भारताच्या गोलंदाजीवर प्रहार केला. त्यामुळेच भारताच्या हातून यावेळी सामना निसटला. अॅलेक्स हेल्स आणि जोस बटलर यांनी अर्धशतक झळकावली, त्याचबरोबर शतकी भागीदारी केली आणि इंग्लंडला विजय मिळवून दिला. बटलरने नाबाद ८० तर हेल्सने ८६ धावा करत इंग्लंडला दहा गड्यांनी विजय मिळवून दिला. भारतीय संघाचे दुसऱ्यांदा टी २० विश्वविजेतेपदाचे स्वप्न अधुरे राहिले. इंग्लंडने १० गडी राखून टीम इंडियाचा दारूण पराभव केला. भारतीय संघ टी२० विश्वचषकातून बाहेर पडला. आता पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात १३ नोव्हेंबरला मेलबर्न येथे अंतिम सामना रंगणार आहे.