‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून प्रेक्षकांना हसवणारा विनोदी कलाकार म्हणजे दादूस उर्फ अरुण कदम. नुकताच अरुण कदम यांच्या मुलीचा विवाह सोहळा पार पडला आहे. मुलीच्या लग्न सोहळ्यातील काही फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
अरुण यांची मुलगी सुकन्या कदमचा ऑगस्ट महिन्यात साखरपुडा झाला होता. काही मोजक्याच लोकांच्या उपस्थित हा साखरपुडा पार पडला. आता गुरुवारी २५ नोव्हेंबर रोजी अगदी साध्या पद्धतीने सुकन्याने बॉयफ्रेंड सागर पावळेशी लग्न केले. या लग्न सोहळ्याचे कुटुंबातील काही जवळच्या व्यक्ती आणि मोजक्याच मित्रपरिवाला आमंत्रण दिल्याचे म्हटले जात आहे. सुकन्याचे लग्नातील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
Video: बॉडीगार्ड शेरावर नाराज झाला सलमान खान, म्हणाला ‘आज तो ये गया’
अरुण कदम यांची मुलगी सुकन्या ही कमर्शिअल आर्टिस्ट, ग्राफिक डिझायनर आहे. शिवाय तिने भरतनाट्यमचे धडे देखील गिरवले आहेत. लॉकडाउनच्या काळात तिने वडिलांसोबत अनेक टिकटॉक व्हिडीओ केले होते आणि ते व्हिडीओ चाहत्यांना प्रचंड आवडले होते. सध्या सुकन्या ही एका कंपनीमध्ये ग्राफिक डिझायनरचे काम करते. तिचा पती सागर ब्रीविंग कन्सल्टंट म्हणून काम करत आहे.