ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ हे कायमच चर्चेत असतात. अशोक सराफ यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त पुण्यात अशोकपर्व कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अशोक सराफ यांचं भरभरुन कौतुक केलं. यावेळी राज ठाकरेंनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरुन एक टोलाही लगावला.

पुण्यात झालेल्या या कार्यक्रमात राज ठाकरेंनी व्यासपीठावरुन भाषण करताना अशोक सराफ यांचे तोंडभरुन कौतुक केले. यावेळी त्यांनी मी तुम्हाला उदंड आयुष्य तुम्हाला मिळो आणि आम्हाला सतत त्यांच्याकडून नवनवीन गोष्टी पाहायला मिळो, अशी प्रार्थनाही आई जगदंबेच्या चरणी केली.
आणखी वाचा : “अशोक सराफ यांना विनोदी अभिनेता म्हणणंच चुकीचं…” राज ठाकरे स्पष्ट बोलले

Devendra Fadnavis on Uddhav Thackeray (1)
Devendra Fadnavis : “आमच्यातील संबंध खूप खराब अशी…”, उद्धव ठाकरेंबरोबरच्या संबंधांबाबत देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका!
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Sanjay Raut Ajit Pawar (1)
“अजित पवारांना आता मुख्यमंत्री व्हायचं नाही, कारण…”, संजय राऊतांची स्तुतीसुमने; नेमकं काय म्हणाले?
Shivsena MLA Arjun Khotkar
Arjun Khotkar : “राजकीय भूकंप काय असतो हे आम्ही दाखवून देऊ”, अर्जुन खोतकरांचं मोठं विधान; कोणाला दिला इशारा?
Chhagan Bhujbal
“तेलगी प्रकरणात माझं…”, दोन दशकानंतर भुजबळांनी मनातली खदखद व्यक्त केली; मंत्रिपदाच्या राजीनाम्याबद्दल म्हणाले…
Uddhav Thackeray, Ahilyanagar, existence,
अहिल्यानगरमध्ये ठाकरे गटाला गळती, अस्तित्वाचा प्रश्न
Raj Thackeray Speech in Mumbai
Raj Thackeray : राज ठाकरेंचं भाजपा नेत्यांबाबत भाष्य, “मुंबईत चहा प्यायला घरी येतो म्हटल्यावर काय सांगायचं, घरीच..”
Uddhav Thackeray should introspect says Chandrashekhar Bawankule
उद्धव ठाकरेंनी आत्मपरीक्षण करावे! बावनकुळे म्हणाले…

“अशोक सराफ यांचे कितीतरी चित्रपट पाहिलेत, नाटक बघितलेत. मला त्यांचं ‘डार्लिंग डार्लिंग’ हे नाटक अजूनही आठवतंय. समोर कोणीही कलाकार असू दे, अशोक सराफ यांना काहीही फरक पडला नाही. कोणत्याही चित्रपटात, नाटकांमध्ये त्यांनी स्वत: प्रभाव कायम ठेवला. ही साधी गोष्ट नाही. मी त्यादिवशी त्यांच ‘व्हॅक्यूम क्लिनर’ नाटक पाहिलं. त्यांच्या एण्ट्रीला सर्व ऑडिटोरिअममध्ये टाळ्यांचा कडकडाट पाहायला मिळाला. ५०-६० वर्ष स्वत:बद्दल कुतहूल जागृक ठेवणं ही साधीसुधी गोष्ट नाही.”

आणखी वाचा : “…तर अशोक सराफ मुख्यमंत्री असते,” भर सभागृहात राज ठाकरेंचे विधान!

“आपल्याकडे मोठी माणसं उरलेली नाहीत, म्हणून आमच्यासारख्या माणसांच्या हस्ते तुमचा सत्कार उरकावा लागतोय, हे दुर्दैव आहे. अशोक सराफ यांचा मी नेहमीच आदर केला आहे. तुमचं मूळ घराणं हे बेळगावचं आणि जन्म मुंबईचा, मला तर वाटतं की तुम्हीच सीमाप्रश्न सोडवला. मला माहिती नव्हते. इतकी वर्षे लोकांना भूरळ घालणे, सतत नवनवीन प्रयोग करणे ही काही सोपी साधी गोष्ट नाही. जर हेच तुम्ही युरोपमध्ये असता तर आज या मंचावर तुमचा सत्कार करण्यासाठी पंतप्रधान इथे असता”, असे राज ठाकरेंनी म्हटले.

Story img Loader