मराठी चित्रपटसृष्टीतला सुपरस्टार म्हणून अभिनेता भरत जाधव यांना ओळखलं जातं. अनेक चित्रपट, नाटक आणि मालिकांमधून आपल्या हसऱ्या चेहऱ्याने भरत जाधव यांनी नेहमी प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. भरत जाधव हे सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. नुकतंच भरत जाधव यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासाठी एक पोस्ट शेअर केली आहे. राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त भरत जाधव यांनी ही खास पोस्ट केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भरत जाधव यांनी नुकतंच इन्स्टाग्रामवर राज ठाकरेंच्या भाषणाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओ राज ठाकरे हे एका व्यासपीठावरुन भरत जाधव यांच्याबद्दल सांगताना दिसत आहे. यात राज ठाकरे हे भरत जाधवच्या आठवणींना उजाळा देत असल्याचे पाहायला मिळत आहे. राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त भरत जाधव यांनी जुना व्हिडीओ पुन्हा शेअर केला आहे. त्याला त्यांनी फार हटके कॅप्शन दिले आहे.

कुशल बद्रिकेच्या परफॉर्मन्सला अनिल कपूर- कियारानंही दिली दाद, व्हिडीओ एकदा पाहाच

भरत जाधव यांची इन्स्टाग्राम पोस्ट

“मा. राजसाहेब ठाकरे..!! खूप वर्षांपासूनची ओळख. मुळात ते राजकारणात जरी सक्रिय असले तरी जेंव्हा कधी आम्ही भेटतो तेंव्हा ते राजकारण या विषयावर अजिबात बोलत नाहीत. मराठी नाटक… मराठी सिनेमा मध्ये सध्या काय चाललंय. जागतिक सिनेमामध्ये सध्या काय चाललंय यावरच सगळ्या गप्पा असतात. सगळ्याच कलाकृतींवर त्यांचं चांगलं निरीक्षण असतं. आपण कुठल्या नवनवीन गोष्टी करायला हव्यात हेही ते सुचवतात.

मध्यंतरी कोरोना काळात केदार त्यांना भेटायला गेला तेंव्हा लॉकडाऊन आणि त्या सर्व गोंधळात नाट्यगृह आणि चित्रपटगृह काही लवकर उघडण्याची चिन्ह दिसत नाहीत म्हणून पुन्हा टेलिव्हिजन करा हे सुचवणारे ही तेच. त्यातुनच पुढे ‘सुखी माणसाचा सदरा’ ची निर्मिती झाली ज्याद्वारे मी टिव्ही वर पुनरागमन केलं.

मुळात त्यांचा स्वभाव असा आहे की ते चटकन कुणाला जवळ करत नाहीत आणि एकदा केलं तर त्याच्यासाठी हवं ते सर्व करण्यासाठी सिद्ध होतात. वेळोवेळी कुठे चुकत असाल तर कानउघाडणी ही करतात आणि चांगलं काम केलं तर मनापासून कौतुकही करतात.

अशा या बहुआयामी व्यक्तिमत्वास व दिलदार नेत्यास वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!!”, अशी पोस्ट भरत जाधव यांनी केली आहे.

दीपिका पदुकोणच्या प्रकृतीत सुधारणा, प्रभाससोबत चित्रपटाच्या शूटींगला पुन्हा सुरुवात

भरत जाधव यांची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे. त्यांच्या या पोस्टवर अनेक लाइक्स आणि कमेंट पाहायला मिळत आहे. भरत जाधवच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत राज ठाकरेंना शुभेच्छा दिल्या आहेत. तर काहींनी त्यावर इमोजी शेअर करत कमेंट केली आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actor bharat jadhav share instagram post for mns raj thackeray birthday wishes nrp