‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावरून घराघरांत लोकप्रिय झालेले नाव म्हणून भाऊ कदम यांना ओळखले जाते. विनोदाचे बादशाह अशी त्यांची सर्वत्र महाराष्ट्रात ओळख आहे. आपल्या विनोदबुद्धीने आणि विनोदाचं अचूक टायमिंग साधत भाऊ कदमने अनेकांची मनं जिंकली. पांडू या चित्रपटानंतर आता भाऊ कदम हे एका नव्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. नुकतंच त्यांच्या आगामी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. ‘घे डबल’ असे या चित्रपटाचे नाव आहे.

अभिनेते भाऊ कदम आणि भूषण पाटील यांची दुहेरी भूमिका असलेला ‘घे डबल’ हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. येत्या ३० सप्टेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या टीझर पाहून हा एकंदरीत कॉमेडी चित्रपट असल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे येत्या ३० सप्टेंबरपासून सर्वत्र डब्बल कॉमेडीची हवा होणार आहे. त्यातच अभिनेते भाऊ कदम आणि भूषण पाटील यांची दुहेरी भूमिका असल्याने हा चित्रपट चांगलाच चर्चेत आहे.

Dhoom 4
रणबीर कपूरच्या ‘धूम ४’मध्ये खलनायक कोण असणार? दाक्षिणात्य अभिनेत्याची वर्णी लागण्याची शक्यता
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
vikrant massey rajkumar hirani web sereies debut
राजकुमार हिरानींचा मुलगा ‘या’ वेब सीरिजमधून अभिनय क्षेत्रात करणार पदार्पण, ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता दिसणार खलनायकाच्या भूमिकेत
Fox teasing sleeping lion in jungle see what happened next funny video goes viral on social media
झोपलेल्या सिंहाच्या चक्क शेपटीला चावला कोल्हा; सिंह दचकला अन्…; VIDEO पाहून म्हणाल, “मौत को छूकर टक से वापस आ गया”
prince narula yuvika chaudhary lohri celebration with daughter
सोशल मीडियावरील मतभेदानंतर ‘बिग बॉस’ फेम जोडपे प्रथमच दिसले एकत्र; लेकीसह साजरी केली लोहरी, फोटो आले समोर
Zebra vs Crocodile fight video zebra escaped from crocodiles jaws netizens were shocked video goes viral
“नशीब नाही प्रयत्नांचा खेळ” मगरीच्या जबड्यातून असा निसटला झेब्रा; VIDEO पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
Paaru
Video: “देवीआईंनासुद्धा कळायला पाहिजे…”, पारू अनुष्काचे सत्य अहिल्यादेवीसमोर आणणार? मालिकेत ट्विस्ट, पाहा प्रोमो
Brother uses Polaroid camera for sisters photoshoot
मी तुझे फोटो काढू का?’ भावाने लाडक्या बहिणीचे केले फोटोशूट; प्रेमळ VIDEO पाहून म्हणाल, ‘भाऊ असावा तर असा!’

आणखी वाचा : “माझ्या आयुष्यातील प्रेयसीची जागा…”, कुशल बद्रिकेच्या ‘त्या’ पोस्टची सर्वत्र चर्चा

जिओ स्टुडिओज आणि फाईन क्राफ्ट निर्मित ‘घे डबल’ चित्रपटाचे भन्नाट टीझर पोस्टर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाले होते. या पोस्टरवरील भाऊ आणि भूषण यांच्या डबल रोलविषयी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली. नुकतंच या चित्रपटाचा टीझर सगळ्यांच्या भेटीला आला आहे.

आणखी वाचा : रणबीर कपूरच्या ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटात झळकणार शाहरुख खान, प्रोमो आला समोर

विश्वास जोशी यांनी ‘घे डबल’ चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तर ज्योती देशपांडे आणि जिओ स्टुडिओज चित्रपटाचे निर्माते आहेत. येत्या ३० सप्टेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. खळखळून हसवण्यासाठी सज्ज असणाऱ्या या चित्रपटात कॉमेडी किंग भाऊ कदम आणि अभिनेता भूषण पाटील सोबतच छाया कदम, भारत गणेशपुरे, किशोर कदम, ओमकार भोजने, विद्याधर जोशी आणि संस्कृती बालगुडे अशी तगडी स्टारकास्टही पाहायला मिळणार आहे.

Story img Loader