मराठमोळा अभिनेता भूषण प्रधान सध्या कामानिमित्त लंडनला गेला आहे. लंडनमधील विविध फोटो शेअर करून भूषण आपल्या चाहत्यांचे मनोरंजन करत असतो. अभिनेत्याने अलीकडेच त्याच्या इन्स्टाग्रामवर लंडनमधील लिसियम नाट्यगृहातील वॉशरुमचा व्हिडीओ शेअर केला होता. हा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे, परंतु वॉशरुमचा व्हिडीओ शेअर करण्यामागे नेमके कारण काय आहे जाणून घेऊया…

हेही वाचा : जितेंद्र जोशीची लेकीसह लंडनवारी; भावुक पोस्ट करत म्हणाला “रेवा, १३ महिन्यांची असताना…”

भूषणने लंडनमधील वॉशरुमचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यामागे खास कारण होते. अनेक देशांमध्ये लहान मुलांचे कपडे बदलण्यासाठी किंवा त्यांना स्वच्छ करण्यांसाठी महिलांच्या वॉशरुममध्ये एक वेगळा विभाग राखीव असतो, परंतु पुरुषांच्या स्वच्छतागृहात अशी कोणतीच सोय केलेली नसते. परंतु, भूषणने शेअर केलेल्या लिसियम नाट्यगृहातील पुरुषांच्या स्वच्छतागृहात ही विशेष सुविधा होती. म्हणूनच, त्याने हा खास व्हिडीओ चित्रित करून शेअर केला आहे.

हेही वाचा : “ए आर रहेमानच्या आईने प्रार्थना केली अन्…” शंकर महादेवन यांनी सांगितला ‘तो’ किस्सा, म्हणाले “त्यांचे खूप उपकार…”

अभिनेता भूषण प्रधान व्हिडीओ शेअर करताना लिहितो, “मुलांचे कपडे बदलणे, त्यांना स्वच्छ करणे ही केवळ महिलांची जबाबदारी नसून पुरुषांची सुद्धा जबाबदारी आहे. दोघांनीही आपल्या मुलांची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. लंडनच्या या वॉशरुममधील ‘बेबी चेजिंग’ स्टेशन पाहून आज खऱ्या अर्थाने समानतेची जाणीव झाली.”

भूषणच्या पोस्टवर कमेंट करीत नेटकऱ्यांनी त्याचे कौतुक केले आहे. अनेकांनी “तू जाणीवपूर्वक लक्ष देऊन ही गोष्ट पाहिलीस…हा व्हिडीओ शेअर केल्याबद्दल धन्यवाद”, तर काही जणांनी “अशा सुविधा आता सगळ्या देशांमध्ये दिल्या पाहिजेत” अशा प्रतिक्रिया अभिनेत्याने शेअर केलेल्या व्हिडीओवर दिल्या आहेत.

Story img Loader