‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेला राणादा आणि पाठकबाई म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर हे दोघेही लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. सध्या त्या दोघांच्या घरी लगीनघाई सुरु आहे. त्यातच त्या दोघांच्या सेलिब्रेशनचे फोटो समोर आले आहेत. अभिनेत्री अक्षया देवधरने हिने नुकतंच तिच्या बॅचलर पार्टीचे फोटो शेअर केले आहे. तिने चक्क दाक्षिणात्य पद्धतीने पार्टी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अक्षया देवधर ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. नुकतंच तिने इन्स्टाग्रामवर याचे काही खास फोटो शेअर केले आहेत. यात ती तिच्या मैत्रिणींसोबत बॅचलर पार्टी करताना दिसत आहे. याचे काही फोटो अक्षयाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केले आहेत. यात तिच्या मैत्रिणीने अगदी दाक्षिणात्य पद्धतीने लुंगी परिधान केली आहे. तसेच तिने यावेळी केसात गजरा माळलेला दिसत आहे. तिचे हे फोटो चांगलेच चर्चेत आहे.
आणखी वाचा : राणादाची लगीन घाई, हार्दिक जोशीच्या केळवणाचे फोटो समोर, ‘या’ व्यक्तीच्या घरातून केली सुरुवात

तर दुसरीकडे हार्दिक जोशीही त्याच्या बहिणीच्या घरी केळवणासाठी गेल्याचे पाहायला मिळत आहे. हार्दिकने शेअर केलेल्या या फोटोत तो छान पारंपारिक वेशात पाहायला मिळत आहे. यात त्याच्या समोर केळीच्या पानात महाराष्ट्रीय पद्धतीने छान साग्रसंगीत जेवण वाढल्याचे दिसत आहे. तर त्याच्या पाठीमागे भिंतीवर हार्दिकचे केळवण असे केळीच्या पानावर लिहिण्यात आले आहे. त्याचे हे फोटो व्हायरल झाले आहेत.

आणखी वाचा : राणादा आणि पाठकबाईंच्या साखरपुड्यावर एक्स बॉयफ्रेंडची पहिली प्रतिक्रिया, अक्षया देवधर म्हणाली…

त्यांच्या दोघांचे हे फोटो पाहून ते दोघेही लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याचे बोललं जात आहे. मात्र अद्याप त्यांच्या लग्नाची तारीख समोर आलेली नाही. तसेच त्यांची लग्नपत्रिका किंवा लग्न स्थळ याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र त्यांचे अनेक चाहते त्यांच्या लग्नाच्या दिवशाची आतुरतेने वाट पाहताना दिसत आहेत.