‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेला राणादा आणि पाठकबाई म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर हे दोघेही गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने चर्चेत आहेत. ते दोघेही लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. छोट्या पडद्यावर लोकप्रिय ठरलेल्या या जोडीने अक्षय्य तृतीया दिवशी साखरपुडा करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. याचे अनेक फोटो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर आता हार्दिक जोशीच्या केळवणाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे ते दोघेही लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याचे बोललं जात आहे.

हार्दिक जोशी हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. नुकतंच त्याने इन्स्टाग्रामवर काही खास फोटो शेअर केले आहेत. यात तो त्याच्या बहिणीच्या घरी केळवणासाठी गेल्याचे पाहायला मिळत आहे. याला त्याने खास कॅप्शनही दिले आहे.
आणखी वाचा : राणादा आणि पाठकबाईंच्या साखरपुड्यावर एक्स बॉयफ्रेंडची पहिली प्रतिक्रिया, अक्षया देवधर म्हणाली…

हार्दिकने शेअर केलेल्या या फोटोत तो छान पारंपारिक वेशात पाहायला मिळत आहे. यात त्याच्या समोर केळीच्या पानात महाराष्ट्रीय पद्धतीने छान साग्रसंगीत जेवण वाढल्याचे दिसत आहे. तर त्याच्या पाठीमागे भिंतीवर ‘हार्दिकचे केळवण’ असे केळीच्या पानावर लिहिण्यात आले आहे.

आणखी वाचा : “मी आणि सिद्धार्थ जाधव १० वर्षे एकमेकांशी बोलत नव्हतो आणि श्रीदेवींच्या निधनानंतर…” सोनाली कुलकर्णीने सांगितला किस्सा

‘बहिणीकडून केळवणाची सुरुवात…’, असे हार्दिकने या फोटोला कॅप्शन दिले आहे. या फोटोवर त्याचे अनेक चाहते कमेंट करताना दिसत आहे. अनेकांनी त्याच्या फोटोवर आता लग्न कधी? लग्नाची तारीख काय? आम्हालाही लग्नाला बोलवं? अशा कमेंट केल्या आहेत. दरम्यान त्याच्या या केळवणाच्या फोटोमुळे तो बिग बॉसमध्ये सहभागी होणार की नाही याबद्दल शंका उपस्थित केली जात आहे. त्यामुळे सध्या तरी हार्दिक हा बिग बॉसमध्ये सहभागी होणार नाही, असे चित्र दिसत आहे.

Story img Loader