आज मराठीतला एव्हरग्रीन चित्रपट ‘अशी ही बनवा बनवी’ चित्रपटाला ३४ वर्ष पूर्ण झाली. आजही अनेक रसिक प्रेक्षक हा चित्रपट वारंवार पाहतात. यंदा चित्रपटगृह व्यावसायिकांनी एकत्र येऊन २३ सप्टेंबर राष्ट्रीय चित्रपट दिन साजरा करण्याचं ठरवलं आहे. याच औचित्य साधून प्रेक्षकांनी कमीत कमी खर्चात चित्रपटांचा आनंद घेता यावा यासाठी ७५ रुपये तिकिटाची घोषणा करण्यात आली. यादिवशी कोणताही चित्रपट तुम्ही ७५ रुपयांमध्ये बघू शकतात. या संकल्पनेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. याच संकल्पनेवर अभिनेता दिग्दर्शक हेमंत ढोमे याने आपले मत मांडले आहे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आपल्या अभिनयनाने प्रेक्षकांची मन जिंकणारा अभिनेता हेमंत ढोमेने आपल्या पोस्टमध्ये लिहलं आहे की ‘आज राष्ट्रीय सिनेमा दिनाच्या निमित्ताने चित्रपटगृहांनी ७५ रु. असा सवलतीचा तिकीट दर लावल्या नंतर प्रेक्षकांनी तुडुंब गर्दी केलीय! सगळीकडे मराठी चित्रपट हाऊसफुल्ल! म्हणजे तिकीट दर कमी असतील तर प्रेक्षक गर्दी करू शकतात? प्रेक्षकांसाठी मनोरंजन महाग होतंय का’? असा प्रश्न त्याने उपस्थित केला आहे. यावर नेटकऱ्यांनी कॉमेंट्स केल्या आहेत. बऱ्याच जणांनी हेमंतच्या मतावर सहमती दर्शवली आहे. तसेच काही जणांनी चित्रपटगृहातील मिळणारे खाद्य पदार्थ किती महाग असतात यावर भाष्य केलं आहे.

हृतिक रोशनची ‘या’ पाकिस्तानी अभिनेत्रीच्या फोटोवरची कॉमेंट चर्चेत!! म्हणाला “लव्ह.. “

गेली दोनवर्ष करोनामुळे चित्रपटगृह बंद होती, चित्रपगृह चालू झाल्यांनतरदेखील ५० % क्षमतेत सुरु झाली होती. अनेक चित्रपटगृह मालक चिंतेत होते, त्यात आता ओटीटीसारखा पर्याय प्रेक्षकांपुढे असल्याने चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षक फारसे फिरकत नव्हते. हिंदीतले अनेक बिग बजेट चित्रपट फारसे चालले नाहीत. याउलट मराठीतले ‘पावनखिंड’, ‘शेर शिवराज’, ‘झोंबिवली’, ‘टाईमपास ३’ यासारख्या चित्रपटाला प्रेक्षकांनी गर्दी केली होती.

हेमंत ढोमे कायमच सोशल मीडियावर सक्रिय असतो. आपली राजकीय मत तो ठामपपणे मांडत असतो. एकांकिका, नाटक, चित्रपट असा त्याचा प्रवास आहे. ‘बघतोस काय मुजरा कर’ सारख्या चित्रपटातून त्याने दिग्दर्शनात पाऊल ठेवले आहे. नुकताच त्याचा ‘झिम्मा’ हा चित्रपट येऊन गेला होता. ‘चोरीचा मामला’, ‘ऑनलाईन बिनलाईन’, ‘क्षणभर विश्रांतीसारख्या’ मराठी चित्रपटांमध्ये त्याने काम केलं आहे.