अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याने राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. अजित पवारांनी रविवारी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा देत मंत्रिपदाची शपथ घेतली आणि राष्ट्रवादीच्या काही आमदारांनासह त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला. या सत्तानाट्यावर आता विविध क्षेत्रातून प्रतिक्रिया येत आहेत. महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थितीवर अभिनेता हेमंत ढोमेने केलेल्या ट्वीटने सध्या लक्ष वेधून घेतले आहे.

हेही वाचा : “वडिलांच्या ओळखीची काय गरज?”, नवाजुद्दिन सिद्दिकीची पत्नी पूजा भट्टवर भडकली; म्हणाली, “मी कधीच गैरफायदा…”

Uddhav Thackeray on PM Narendra Modi
“आधी मणिपूर ‘सेफ’ करा आणि मग…”; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं मोदी सरकारवर टीकास्र!
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Yogi Adityanath who made the statement Batenge to Katenge now has a different slogan Pune news
‘बटेंगे तो कटेंगे’ असे वक्तव्य करणारे याेगी आदित्यनाथ यांचा आता ‘हा’ नारा
Maharashtra, Delhi Politics, Small State,
लिलीपुटीकरण…
What Devendra Fadnavis Said?
Devendra Fadnavis : “बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है या घोषणांमध्ये चुकीचं काहीच नाही, या घोषणा..”; देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य
Anshula Kapoor talks about parents Boney Kapoor Mona Kapoor divorce
“माझे आई-वडील वेगळे झाल्यावर…”, पालकांच्या घटस्फोटाबाबत पहिल्यांदाच बोलली जान्हवी कपूरची सावत्र बहीण
devendra fadnavis criticize uddhav thackeray for making video of bag checking
“त्यांच्या आधी माझी बॅग तपासली, केवळ भांडवल…”, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे टीकास्त्र

हेमंत ढोमे आपल्या ट्वीटमध्ये म्हणतो, “खेळ तर आता सुरु झालाय…” अभिनेत्याच्या या ट्वीटवर अनेक नेटकरी प्रतिक्रिया देत आहे. एका युजरने “काय बोलायचं आपण फक्त बघत बसायचं…”, तर दुसऱ्या एका युजरने “खरंय, सगळ पद्धतशीपणे होणार…” अशा प्रतिक्रिया अभिनेत्याच्या पोस्टवर केल्या आहेत. हेमंत ढोमेप्रमाणे अभिनेत्री तेजस्वी पंडितने सुद्धा महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर आपले मत व्यक्त करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.

हेही वाचा : जेएनयूमध्ये 72 Hoorain चित्रपटाचे स्पेशल स्क्रीनिंग, निर्मात्यांचा मोठा निर्णय; म्हणाले, “दहशतवादी घटना…”

हेमंत ढोमेचे ट्वीट

हेही वाचा : कार्तिक-कियाराच्या ‘सत्यप्रेम की कथा’मधील वादग्रस्त शब्दांवर सेन्सॉर बोर्डाची कात्री, निर्मात्यांनी चित्रपटात केले ‘हे’ बदल

दरम्यान, २०१०, २०१२, २०१९ मध्ये दोन वेळा आणि आता २०२३ मध्ये अशी एकूण पाच वेळा अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. मागील काही दिवसांपासून अजित पवार नाराज असल्याच्या चर्चा होत्या तसेच या राजकीय भूकंपाची चर्चा गेल्या ३ ते ४ महिन्यांपासून सुरु होती. अखेर आज राजभवनावर दाखल होत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्रिमंडळातील इतर मंत्र्यांच्या उपस्थितीत अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.