अभिनेता ऋषिकेश जोशी मराठी चित्रपटसृष्टीतील एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व, त्याची प्रत्येक भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडत असते. ‘पोश्टर बॉईज, आजचा दिवस माझा’ या चित्रपटातील त्याने साकारलेल्या व्यक्तिरेखा चांगल्याच गाजल्या. केवळ मराठीतच नव्हे तर हिंदीत चित्रपटसृष्टीत त्याने काम केले आहे. ब्रेथ या वेबसिरीजमध्ये त्याची भूमिका सगळ्या प्रेक्षकांना आवडली होती. करोना काळात त्याने पहिल्यांदा ऑनलाईन नाटकाचा प्रयोग केला होता.

ऋषिकेश जोशी याने नुकतेच आपल्या फेसबुक अकाऊंटवर नव्या चित्रपटाचे पोस्टर टाकले आहे. ‘भाऊबळी’ असं चित्रपटाचे नाव आहे. ‘विनोदाचा तडका लावायला आणि अनलिमिटेड कल्ला करायला येतोय ‘भाऊबळी’, १६ सप्टेंबरपासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात. असा कॅप्शन देखील दिला आहे. चित्रपटाच्या पोस्टरमध्ये अनेक मात्तबर कलाकार दिसत आहेत. मनोज जोशी, किशोर कदम, संतोष पवार, मेधा मांजरेकर आणि इतर कलाकार दिसत आहेत.

Festival of Italian films at the Regal movie theater Cinema Paradiso
‘रीगल’मध्ये इटालियन चित्रपटांचा महोत्सव; रसिकांना विनामूल्य पाहण्याची संधि
china biggest dam in the world
चीनमधील ‘या’ अवाढव्य धरणामुळे पृथ्वीचा वेग मंदावला? धरणाचा…
marathi movie Phulvanti will be released on October 11
‘फुलवंती’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
National Film Day, Navra Maza Navsacha 2,
‘राष्ट्रीय चित्रपट दिना’चा मुहूर्त फळला, ‘नवरा माझा नवसाचा २’सह सगळ्याच चित्रपटांचे शो ८० ते ९० टक्के हाऊसफुल
Kareena Kapoor Khan taimur ali khan
Video : “मी लोकप्रिय आहे का?” तैमूर आई करीनाला विचारतो प्रश्न, ती काय उत्तर देते? जाणून घ्या
Navra Maza Navsacha 2 loksatta latest news
पुन्हा एकदा मनोरंजनाचा प्रवास, ‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपटातील कलावंत ‘लोकसत्ता’ कार्यालयात
amitabh bachchan reacting on re releasing movies
जुन्या चित्रपटांचे पुन:प्रदर्शन! अमिताभ बच्चन एव्हरग्रीन ‘शोले’बद्दल म्हणाले, “मोबाइलवर कधीही चित्रपट पाहिला नाही…”
old movies, mumbai, movies re-released,
जुन्या चित्रपटांचे पुन:प्रदर्शन; नवीन चित्रपट नसल्याने चार जुने चित्रपट पुन्हा प्रदर्शित

न्यूयॉर्कच्या महापौरांनाही पडली अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ची भुरळ!

चित्रपटाचे लेखन जयंत पवार आहेत तर दिग्दर्शनाची धुरा समीर पाटील यांनी सांभाळली आहे. झी स्टुडिओने चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. १६ सप्टेंबर पासून हा चित्रपट प्रेक्षकांचे मनोरंजन करणार हे नक्की. दिग्दर्शक समीर पाटील यांनी याआधी शेंटिमेंटल, पोश्टर बॉय, पोश्टर गर्ल या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे ते स्वतः उत्तम निवेदक आणि अभिनेते आहेत.

मराठी चित्रपटात वेगवेगळे प्रयोग होताना दिसून येत आहेत. ऐतिहासिक, बायोपिक, गुन्हेगारी जगतावर भाष्य करणारे असे विविध प्रकारचे चित्रपट येत आहेत. ऋषिकेश जोशीच्या नव्या चित्रपटाने रसिक प्रेक्षक पुन्हा एकदा खळखळून हसणार हे मात्र नक्की.