‘बालक पालक’, ‘टाइमपास’ चित्रपटांमुळे नावारुपाला आलेला अभिनेता म्हणून प्रथमेश परबला ओळखले जाते. प्रथमेश परब हा सध्या यशाच्या शिखरावर आहे. प्रथमेश हा टाईमपास या चित्रपटातील दगडू या भूमिकेमुळे प्रसिद्धीझोतात आला. “हम गरीब हुए तो क्या हुआ दिल से अमीर है’ म्हणणारा प्रथमेश हा कायमच चर्चेत असतो. प्रथमेशचा टाईमपास ३, टकाटक २ हे चित्रपट चित्रपटगृहात चांगलेच चर्चेत असल्याचे पाहायला मिळत आहे. अनेकजण यातील त्याच्या भूमिकेचे कौतुक करत आहेत. नुकतंच अभिनेते किरण माने यांनी प्रथमेश परबचे कौतुक करणारी एक पोस्ट शेअर केली आहे.

स्टार प्रवाहवरील ‘मुलगी झाली हो’ या मालिकेमुळे प्रसिद्धीझोतात आलेले अभिनेते किरण माने हे फेसबुकवर कायमच सक्रीय असतात. नुकतंच त्यांनी प्रथमेश परबसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. याला कॅप्शन देतांनी त्यांनी त्याचे कौतुक केले आहे.
“दिघे साहेबांची गोष्ट खोटी…” प्रसाद ओकचे ‘ते’ वक्तव्य चर्चेत

Pankaja Munde
Pankaja Munde : वेगळा पक्ष काढण्याच्या विधानावर पंकजा मुंडेंचं स्पष्टीकरण; म्हणाल्या, “त्या विधानाचा अर्थ…”
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Indians deported entering us via donkey route
अग्रलेख : ‘डंकी’ डंख!
PM Narendra Modi Speech
Narendra Modi : आणीबाणी ते कलाकारांवर बंदी! नरेंद्र मोदींनी ‘हे’ पाच मुद्दे उपस्थित करत काँग्रेसला करुन दिली संविधानाची आठवण
Cm Devendra Fadnavis Statement About Suresh Dhas
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस म्हणाले, “सुरेश धस आधुनिक भगीरथ एकदा मागे लागले की डोकं खाऊन….”
Pratap Patil Chikhlikar on Ashok Chavan
Pratap Patil Chikhlikar : प्रताप पाटील चिखलीकरांचा अशोक चव्हाणांना मोठा इशारा; म्हणाले, “जर कोणात खुमखुमी असेल तर…”
Mahesh Elkunchwar , Nagpur , Girish Kuber ,
अन्यथा.. स्नेहचित्रे : आता निघायची वेळ झाली…
What Suresh Dhas Said?
Suresh Dhas : सुरेश धस सगळा हिशेब मांडत म्हणाले, “धनंजय मुंडे पालकमंत्री असताना ७३ कोटी…”

किरण मानेंची फेसबुक पोस्ट

“…’टकाटक 2′ मधी या पोरानं धम्माल उडवून दिलीय भावांनो ! प्रथमेश परब ह्या पोराचं पयल्यापास्नंच मला लै लै लै कौतुक वाटतं. मी ह्याला मुंबैतल्या इंटर काॅलेज एकांकिका स्पर्धांपास्नं बघतोय. रूढ अर्थानं ज्याला पिच्चरचा ‘हिरो’ म्हन्लं जातं तसं ह्याच्या पर्सनॅलिटीत काय बी नाय. उलट रस्त्यावरनं फिरताना एखाद्या पोराला “अय् हिरोS, बाजूला सरक.” असं म्हन्लं जातं, त्या टाईपमधी हे पोरगं येतं…आनि आजकाल तर मराठी फिल्म इंडस्ट्रीतबी उंच, गोर्‍यापान, देखन्या, बाॅडीबिल्डर पोरांचं ‘पीक’ आलंय. तरीबी सोत्ताच्या हिमतीवर, अभिनयाच्या ताकदीवर, आत्मविश्वासावर, सगळ्या हॅंडसम हंक पोरास्नी “अय् हिरो, बाजूला सरक.” म्हनत, हे पोरगं ‘हिरो’ झालं ! एक नाय, दोन नाय चार-चार सुप्परडुप्परहिट्ट पिच्चर दिले !!

…’टकाटक’ त्यातलाच एक. तीनचार वर्षांपूर्वी या पिच्चरनं बाॅक्स ऑफिसवर रेकाॅर्डब्रेक धमाका केलावता. मराठीत काॅलेज गोईंग पोरापोरींना ‘टारगेट ऑडीयन्स’ मानून, त्यांची आवडनिवड डोळ्यापुढं ठेवून लै कमी पिच्चर आले. हे लक्षात घेवून दिग्दर्शक मिलिंद कवडे यांनी टकाटकच्या निमित्तानं ‘सेक्स काॅमेडी’ ह्यो प्रकार लै नादखुळा पद्धतीनं हाताळला. तरून पोरापोरींची भाषा, त्यांचे शब्द, डबल मिनिंग डायलाॅग्ज, सेक्सबद्दल त्या वयातलं मनात असलेलं कुतूहल, त्यातनं होनार्‍या चुका आनि शेवटी माफक उपदेशाचा डोस…अशा पद्धतीचा ‘टकाटक’ काॅलेजच्या पोरापोरींनी डोक्यावर घेतला.

त्याचाच दूसरा पार्ट ‘टकाटक 2’ काल रिलीज झाला. माझीबी त्यात एक छोटी पण इंट्रेस्टिंग भुमिका हाय. अडनिड्या वयात, या पोरांच्या मनात उधळनार्‍या घोड्यांना लगाम घालायचं काम मी, स्वप्निल राजशेखर, पंकज विष्णू, स्मिता डोंगरे यांच्यावर आहे. काल स्पेशल स्क्रीनिंगला गेलोवतो. अक्षरश: हसून हसून पोटात दुखायला लागलं. ‘ते’ काॅलेजचे दिवस आठवले. हा पिच्चर फक्त काॅलेजला जानार्‍या टीनएजर्ससाठी नाय भावांनो. आपल्यालाबी ‘त्या’ रंगीन,जादूई काळात एक मस्स्त चक्कर मारून यायची आसंल, त्या काळातलं ‘काय काय’ भन्नाट आठवायचं आसंल, आनि मन,मेंदू फ्रेश करायचा आसंल तर ‘टकाटक 2’ नक्की बघा !

प्रथमेश, भावा या पिच्चरच्या शुटिंग, प्रमोशनच्या निमित्तानं तुला जवळनं बघितलं आनि तुझं लैच कौतुक वाटलं. माझ्या करीयरमधी अर्ध्या हळकुंडानं पिवळे झालेले लै लै लै हिरो बघितलेत मी. सिरीयलच्या दुनियेत तर असे पैशाला पन्नास असत्यात. म्हनून मी अशा पोरांपास्नं जरा फटकून लांब असतो. पन तू येगळाच निघालास. ‘सुपरहिट’ असूनबी तुझ्यात कनभरबी गर्व नाय. प्रमोशनला फिरताना ‘सिनीयर’ म्हनून सतत माझी काळजी घेनं… कुठलाबी कमीपना न मानता सोत्ताची खुर्ची मला बसायला देन्यापास्नं, सतत माझ्या चहापान्याची विचारपूस करनं… कॅमेर्‍यापुढं तेवढ्याच एनर्जीनं, आत्मविश्वासानं वावरनं.. हे सगळंच सांगत होतं ‘तू लंबी रेस का घोडा है’ ! लिख ले. आप्पुन ने भौत दुनिया देखेली है…आप्पुन का अंदाज़ा ग़लत होईच नै सकता… लब्यू”, असे किरण माने यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.

“बाहेरच्या देशातील फोटो क्लिअर असतात कारण आपल्या देशात…” हेमांगी कवीची ‘ती’ पोस्ट चर्चेत

दरम्यान ‘टकाटक २’ ची निर्मिती रिलायन्स एंटरटेनमेंट स्टुडिओने, पर्पल बुल एंटरटेनमेंटच्या सहयोगाने केली आहे. तर ओमप्रकाश भट्ट, रिलायन्स एंटरटेनमेंट स्टुडिओ, आदित्य जोशी हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. मिलिंद कवडे हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला.

Story img Loader