‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावरून घराघरांत लोकप्रिय झालेले नाव म्हणजे कुशल बद्रिके. विनोदाचा बादशाह, हुकमी एक्का अशी त्याची ओळख सांगितली जाते. कुशल बद्रिके हा सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतो. अनेकदा तो त्याच्या आगामी नाटकांची, चित्रपटांची माहिती सोशल मीडियाद्वारे शेअर करत असतो. गेल्या काही दिवसांपासून अनेक राजकीय मंडळी विविध मनोरंजन क्षेत्राशी संबंधित कार्यक्रमात हजेरी लावताना दिसतात. नुकतंच अभिनेता कुशल बद्रिकेने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. त्यासोबत त्याने एक पोस्टही लिहिली आहे.

कुशल बद्रिकेने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्याने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. यावेळी त्याच्यासोबत भाऊ कदम, श्रेया बुगडे हे कलाकारही दिसत आहेत. हे सर्वजण चला हवा येऊ द्या च्या एकाच व्यासपीठावर दिसत आहेत. यावेळी त्या सर्वांच्या चेहऱ्यावर एक मिश्किल हसू पाहायला मिळत आहेत. नेहमीच राजकीय आखाड्यात असणाऱ्या या राजकीय नेत्यांच्या हसरा फोटो सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

लहान, मोठी गरीब, श्रीमंत माणसं वेगवेगळ्या प्रकारची असतात पण त्यांचं हसणं मात्र सारखं असतं. असे हसणारे चेहरे एकत्र आले की जणू आनंदाचा धबधबा वाहू लागतो आपण त्या धबधब्याचे तुषार बनुन सोबत वाहत राहायचं बास……, असे कुशलने हा फोटो शेअर करताना म्हटले आहे. त्याच्या या पोस्टवर चाहत्यांकडून कमेंटचा वर्षाव होत आहे.

कुशल बद्रिकेने शेअर केलेली ही पोस्ट चांगलीच चर्चेत आहे. त्याची ही पोस्ट प्रचंड व्हायरल होत आहे. काही दिवसांपूर्वी तो पांडू चित्रपटात झळकला होता. त्यानंतर आता लवकरच तो ‘जत्रा 2’ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Story img Loader