अभिनेता कुशल बद्रिके ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून घराघरांत पोहोचला. सोशल मीडियावरही तो कायम सक्रिय असतो. अभिनेत्याचा मनोरंजन क्षेत्रातील प्रवास सोपा नव्हता, या संपूर्ण प्रवासात त्याला त्याच्या बायकोची खंबीर साथ मिळाली. नुकतीच कुशलने त्याच्या बायकोसाठी इन्स्टाग्रावर खास पोस्ट शेअर केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : ‘द केरला स्टोरी’नंतर आता ‘७२ हूरें’ चित्रपटावरून वाद; लवकरच दहा भाषांमध्ये प्रदर्शित होणार टीझर, निर्माते म्हणाले…

कुशलची पत्नी सुनयना ही उत्तम कथक डान्सर आहे. सध्या ती ‘मुघल-ए-आझम’ या म्युझिकल शोसाठी अमेरिकेला रवाना झाली आहे. त्यामुळे अभिनेत्याने बायकोच्या आठवणीत खास पोस्ट शेअर केली आहे. कुशलने त्याच्या डिजिटल घड्याळाचा फोटो शेअर केला असून, या घड्याळात पत्नी सुनयनाचा फोटो कुशलने वॉलपेपर म्हणून ठेवला आहे. या फोटोला कॅप्शन देत कुशल म्हणतो, “मैं हर “वक़्त” बस तुम्हें देखना चाहता हूँ.” सध्या कुशलने केलेली पोस्ट चांगलीच चर्चेत आहे.

हेही वाचा : हॉलीवूड अभिनेत्याने दीपिका पदुकोणसाठी केलेली ‘ती’ पोस्ट चर्चेत; नेटकरी म्हणाले “रणवीर भाई जरा जपून…”

अभिनेत्याच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी असंख्य कमेंट्स केल्या आहेत. यातील एक युजर म्हणतो “दादा वहिनी तुमची जोडी छान आहे”, तर काही जणांनी “क्या बात है कुशलदादा”, “माहितीये रे बाबा तुझ प्रेम आहे बायकोवर…. सरळ सांग ना नवीन घड्याळ घेतलय ते” अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी अमेरिकेतील टाइम्स स्क्वेअर परिसरात ‘मुघल-ए-आझम’च्या फ्लॅश मॉबमध्ये कुशल बद्रिकेची पत्नी सुनयना सहभागी झाली आहे. त्यावेळी सुद्धा कुशलने पत्नीला खास पोस्ट शेअर करीत शुभेच्छा दिल्या होत्या.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actor kushal badrike shared special post for his wife sunayna sva 00