‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावरून घराघरांत लोकप्रिय झालेले नाव म्हणजे कुशल बद्रिके. विनोदाचा बादशाह, हुकमी एक्का अशी त्याची ओळख सांगितली जाते. कुशल बद्रिके हा सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतो. अनेकदा तो त्याच्या आगामी नाटकांची, चित्रपटांची माहिती सोशल मीडियाद्वारे शेअर करत असतो. नुकतंच कुशल बद्रिकेने त्याची पत्नी सुनयनासाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. यात त्याने त्याच्या पत्नीचे खास शब्दात कौतुक केले आहे. त्याची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे.
कुशल बद्रिकेची पत्नी सुनयना ही उत्तम नृत्यांगणा आहे. ती उत्तम कथ्थक डान्स करते. नुकतंच कुशलने इन्स्टाग्रामवर तिचा एक फोटो पोस्ट केला आहे. यात ती कथ्थक करताना दिसत आहे. तिच्या या फोटोसोबत त्याने याला हटके कॅप्शनही दिले आहे.
कुशल बद्रिकेची पोस्ट
“खरंतर तू दिल्लीला जाऊन “कथक केंद्रात” शिकावस, हे माझं स्वप्न होतं. पण घरच्या जबाबदारीत ते मागे पडत राहीलं…… ते राहीलच! पण बघ ना आज तू तिथे परफॉर्म करतेस. खरच तुझा खूप अभिमान वाटतो. आयुष्यातली सगळीच स्वप्न आकार घेत नाहीत, पण त्यातली काही साकार होतात हे खर.”
“ही संधी तुला देणार्यांचे मनःपूर्वक आभार. आणि एकच गोष्ट सांगेन, जा… सिमरन, जा जी ले अपनी जिंदगी…..”, असे कुशलने म्हटले आहे. त्याची ही पोस्ट सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.
दरम्यान कुशल बद्रिके अनेकदा सुनयनाबद्दल सांगत असतो. त्याच्या यशाच्या वाटामध्ये सूनयनचा फार मोठा हात आहे, असेही अनेकदा तो म्हणतो. दरम्यान आता सुखाचे क्षण अनुभवताना सूनयनाची राहिलेली इच्छा पूर्ण झाल्याचे पाहून कुशल हा भावूक झाल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच तो तिला तिची स्वप्न पूर्ण करण्यासाठी पाठिंबाही देताना दिसत आहे.