मराठी कलाक्षेत्रातला चॉकलेट बॉय म्हणून ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे ललित प्रभाकर. छोट्या पडद्यावरून त्याने अभिनयाची सुरवात केली. त्यानंतर हळूहळू मोठ्या पडद्यावर आणि मग वेब सीरिजच्या माध्यमातून त्याने प्रेक्षकांचे मनोरंजन केले. ललित प्रभाकर हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. सध्या सोशल मीडियावर ललित प्रभाकरचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात तो त्याच्या लग्नाबद्दल बोलताना दिसत आहे.
ललित प्रभाकरचे एक रिल सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. यात तो एका मुलीसोबत लग्नाबद्दल बोलत असल्याचे दिसत आहे. या व्हिडीओत तो म्हणतो की, आमचे लग्न ठरणारचं होते पण तेव्हा तिने आतून आवाज दिला आणि म्हणाली चहाला किती शिट्ट्या करू आई? त्याचे हे रिल सर्वत्र व्हायरल होत आहे. ललितचे हे कॉमेडी रिल सर्वत्र व्हायरल होताना दिसत आहे. त्याच्या या रिलनंतर अनेक मुलींनी हसत हसत डोक्याला हात लावला आहे.
ललित प्रभाकरने शेअर केला शर्टलेस फोटो, म्हणाला “प्रश्न पोटा पाण्याचा…”
ललित हा मीडियम स्पायसी या चित्रपटात झळकताना पाहायला मिळत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी नुकतंच त्याने एका रेडिओ चॅनलला भेट दिली. त्यावेळी एका आर जे सोबत त्याने हा व्हिडीओ केला आहे. त्याचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल होताना दिसत आहे. विशेष म्हणजे त्यावर अनेक मुलींनी कमेंट्सही केल्या आहेत.
दरम्यान ललित हा ‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकमुळे प्रसिद्धीझोतात आला. त्याने यात प्रमुख भूमिका साकारली होती. त्यानंतर त्याने बऱ्याच चित्रपट काम केले. त्याच्या ‘आनंदी गोपाळ’या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. काही दिवसांपूर्वी तो झोंबिवली या चित्रपटात झळकला होता. त्यानंतर आता लवकरच तो ‘मीडियम स्पायसी’ या चित्रपटात झळकताना दिसत आहे.