मराठी कलाक्षेत्रातला चॉकलेट बॉय म्हणून ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे ललित प्रभाकर. छोट्या पडद्यावरून त्याने अभिनयाची सुरवात केली. त्यानंतर हळूहळू मोठ्या पडद्यावर आणि मग वेब सीरिजच्या माध्यमातून त्याने प्रेक्षकांचे मनोरंजन केले. ललित प्रभाकर हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. नुकतंच त्याने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. त्याच्या या पोस्टची सध्या सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे.
ललित प्रभाकरने इन्स्टाग्रामला एक पोस्ट शेअर केली आहे. त्यासोबत त्याने एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये ललित हा पाठमोरा उभा आहे. त्यासोबत तो शर्टलेस होऊन शॉवर घेत असल्याचेही दिसून येत आहे. ललितने स्वत:चा शर्टलेस फोटो शेअर त्याला हटके कॅप्शन दिले आहे. तो म्हणाला, ‘प्रश्न पोटा पाण्याचा असला तरी पाठा पाण्याला विसरून चालणार नाही’.
त्याची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याच्या या फोटोवर चाहते कमेंट्स करताना दिसत आहेत. फक्त चाहतेच नव्हे तर अनेक मराठी कलाकाराही त्याच्या फोटोवर कमेंट करताना दिसत आहे. मृण्मयी देशपांडे, हेमंत ढोमे, निपुण धर्माधिकारी अशा अनेक कलाकारांनी त्यावर कमेंट्स केल्या आहेत.
ललितने यापूर्वीही पाण्यासंबंधी एक पोस्ट शेअर केली होती. यात तो एका वॉशबेसिन समोर उभा राहिला असून त्याला कळत नाही आहे की नळ कसा सुरू करावा. तसंच जर त्याने एका नळा खाली हात धरला असेल तर पलीकडच्या नळातून पाणी यायला सुरुवात होते असे या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. ललितने हा व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले की,”हाथ भी नही आया और मूॅंह भी नही लगा”.
दरम्यान त्याच्या या दोन्हीही पोस्ट एखाद्या चित्रपट किंवा त्याच्या आगामी प्रकल्पासंबंधित आहे का, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. ललितने ‘जुळून येती रेशीमगाठी’या मालिकेत प्रमुख भूमिका साकारली होती. त्यानंतर त्याने बऱ्याच चित्रपट काम केले. त्याच्या ‘आनंदी गोपाळ’या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. काही दिवसांपूर्वी तो झोंबिवली या चित्रपटात झळकला होता.