देशात आलेलं करोना मारहामारीचं संकट आणि त्यामुळे प्रदिर्घ काळासाठी लागू झालेलं लॉकडाउन यामुळे हिंदीसोबतच मराठी सिनेसृष्टीला देखील मोठा फटका बसला. अनेक सिनेमांचं चित्रीकरण ठप्प पडलं तर प्रदर्शनाच्या मार्गावर असलेल्या अनेक सिनेमांचं प्रदर्शन पुढे ढकलण्यात आलं. कालांतराने परिस्थिती सुधारू लागल्याने पुन्हा एकदा चित्रिकरणास सरुवात झाली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

निर्बंध हटल्यानंतर अनेक सिनेमांचं शूटिंग पुन्हा सुरु करण्यात आलंय. यातच लोकप्रिय अभिनेते मिलिंद शिंदे यांनी देखील ‘जयंती’ या सिनेमाच्या शूटिंगला पुन्हा एकदा सुरुवात केली होती. मात्र या सिनेमाच्या शूटिंगवेळी मिलिंद शिंदे थोडक्यात बचावले आहेत. मिलिंद शिंदे त्यांच्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखले जातात. आजवर त्यांनी अनेक उत्तम भूमिका साकारल्या आहेत.

सेटवर नेमकं काय घडलं?

सिनेमाचं चित्रीकरण पुन्हा सुरु झाल्याने मोठ्या उत्साहत संपूर्ण सिनेमाची टीम कामाला लागली होती. मल्टी कॅमेरा सेटअर, जीमी जीब क्रेन एका रात्रीच्या सीनसाठी तयारी करण्यात आली होती. यावेळी मिलिंद शिंदे सेटवर स्क्रीप्ट वाचण्यात मग्न होते. तर इतर टीम आपापल्या कामात व्यस्त होती. जीमी जीब क्रेनच्या मदतीने हा सीन शूट करण्यात येणार होता. यासाठी क्रेन वेगाने खाली येणार होती. या सीनच्या सरावात कॅमेरा टीम चांगलीच गुंतली होती. यावेळी जीमी जीब ज्या दिशेने येणार होती त्या दिशेला वाचनात रमलेल्या उभ्या असलेल्या मिलिंद शिंदेंकडे कुणाचीच नजर गेली नाही. जीम जीब वेगाने मिलिंद शिंदेंच्या दिशेने आली. एवढ्यात क्रेन नियंत्रित करणाऱ्या ऑपरेटरचं लक्ष मिलिंद शिंदेंकडे गेलं आणि त्याने चपळाईने क्रेन दुसऱ्या दिशेला वळवली. तर याच वेळी देखील क्षणाचाही विलंब न करता मिलिंद शिंदे खाली वाकले. दैव बलवत्तर म्हणून या घटनेतून मिलिंद शिंदे थोडक्यात बचावले.

हे देखील वाचा: राज कुंद्राच्या अटकेनंतर मुलगा वियानने शेअर केली पहिली पोस्ट

क्रेनवरील ऑपरेटरच्या प्रसंगावधानामुळे मिलिंद शिंदेंचा जीव थोडक्यात बचावला आणि अनर्थ टळला. ‘जयंती’ हा सिनेमा नावामुळे चर्चेत असतानाच आता मिलिंद शिंदे यांच्यासोबत घडलेल्या घटनेमुळे सिनेमा आणखीनच चर्चेत आलाय. शैलेश नरवाडे हे या सिनेमाचे दिग्दर्शक असून लवकरच सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं ते म्हणाले आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actor milind shinde survived briefly during the shooting on set kpw