मराठीमध्ये एकापोठापाठ एक ऐतिहासिक चित्रपट प्रदर्शित होत आहेत. ऐतिहासिक चित्रपटांकडे प्रेक्षकांचा ओढा देखील वाढला आहे. अशामध्येच आता अभिनेते डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी नव्या ऐतिहासिक चित्रपटाची घोषणा केली आहे. ‘गरुडझेप’ असं या चित्रपटाचं नाव आहे. चित्रपटाचा टीझर पाहून प्रेक्षकांमध्ये ‘गरुडझेप’ बाबत उत्सुकता आणखीनच वाढली आहे. आता या चित्रपटामधील पहिलं गाणं प्रदर्शित झालं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा – रणबीर कपूरची जादू फिकी, अवाढव्य खर्च, जबरदस्त प्रमोशन करूनही ‘शमशेरा’ला थंड प्रतिसाद

अमोल कोल्हे यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे याबाबत माहिती दिली. ‘बम बम भोले’ असं या चित्रपटामधील गाण्याचं नाव आहे. या गाण्यामध्ये अमोल कोल्हे यांची झलक पाहायला मिळत आहे. तसेच चित्रपटाची उत्सुकता वाढवणाऱ्या या गाण्याला प्रेक्षकांची पसंती मिळताना दिसत आहे. या गाण्यामधील अमोल कोल्हे यांचा लूक विशेष लक्षवेधी ठरत आहे.

पाहा व्हिडीओ

“वेरूळच्या घृष्णेश्वराला, रायगडच्या जगदीश्वराला नमन करून आपल्या ‘शिवप्रताप – गरुडझेप’ चित्रपटामधील पहिलं गाणं खास आपल्यासाठी” असं अमोल कोल्हे यांनी गाणं शेअर करताना म्हटलं आहे. या गाण्याची खासियत म्हणजे सुप्रसिद्ध गायक कैलाश खेर यांनी हे गाणं गायलं आहे. तर शशांक पोवार यांनी या गाण्याला संगीत दिलं आहे.

आणखी वाचा – Photos : कार्तिकी गायकवाडच्या भावाने वयाच्या अवघ्या २२व्या वर्षी वडिलांसाठी खरेदी केली लाखो रुपयांची गाडी, पाहा फोटो

जगदंब क्रिएशन्स प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती स्वतः अमोल कोल्हे यांनीच केली आहे. तसेच चित्रपटाचे दिग्दर्शन कार्तिक राजाराम केंढे यांनी केले आहे. सप्टेंबर २०२२मध्ये हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दाखल होईल.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actor politician amol kolhe historical movie garudjhep movie song release on social media see video kmd