अभिनेता-दिग्दर्शक प्रसाद ओक कायमत त्याच्या कामामुळे चर्चेत राहिला आहे. सोशल मीडियावरही तो बराच सक्रिय असतो. पत्नी मंजिरी ओकबरोबर तर तो अनेक मजेशीर व्हिडीओ शेअर करताना दिसतो. २०२२ वर्ष आता काही तासात संपणार आहे त्या धर्तीवर प्रसादने इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट शेअर केली आहे.
प्रसाद ओकने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. सरत्या वर्षातील आठवणींना उजाळा देत त्याने व्हिडीओ शेअर केला आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहले आहे “प्रिय २०२२ तू मला भरभरून दिलासा मी तुला कधीही विसरू शकणार नाही. माझ्या आयुष्यात कायमच तू सोनेरी वर्ष म्हणून राशी; काळजी घे आणि तुझ्या शुभेच्छा आणि आशीर्वाद २०२३ कडे अलगद पोहचव आणि त्याला सांग माझ्यावर प्रेम आणि आशीर्वाद तुझ्यासारखं कायम ठेव म्हणावं…” अशा शब्दात त्यानेआपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
यावर्षी त्याचा ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ चित्रपट चांगलाच सुपरहिट ठरला. या चित्रपटात त्याची मुख्य भूमिका होती. तसेच त्याने दिग्दर्शित केलेला ‘चंद्रमुखी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटालादेखील उत्तम प्रतिसाद मिळाला होता.यावर्षी त्याच्यावर त्याला अनेक पुरस्कारदेखील मिळाले आहेत.