मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता प्रसाद ओक सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. प्रसाद त्याच्या कामाबाबतची माहिती अनेकदा शेअर करताना दिसतो. पत्नी व कुटुंबियांबरोबरचे फोटोही प्रसाद शेअर करत असतो. पती पत्नीचे रील्स सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यावरच प्रसाद ओकने प्रतिक्रिया दिली आहे.

प्रसाद ओकला त्याच्या पत्नीची म्हणजे मंजिरी ओकची कायम साथ मिळत असते. नुकतेच दोघे महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण या पुरस्कार सोहळ्याच्या रेड कार्पेटवर एकत्र आले होते. तेव्हा माध्यमांशी संवाद साधताना त्याने प्रतिक्रिया दिली. दिवसाला किती रील्स बनवता या प्रश्नावर प्रसाद म्हणाला, नाही असं काही नाही आम्हा दोघांच्या आयडिया असतात. कधी तिला सुचतं कधी मला सुचतं, लोकांचं मनोरंजन करणं हा आपला धर्म आहे.” अशा शब्दात त्याने आपली प्रतिक्रिया दिली.

Ramesh Deo
मुंबईतील ‘या’ रस्त्याला दिले दिवंगत अभिनेते रमेश देव यांचे नाव; अजिंक्य देव भावना व्यक्त करत म्हणाले, “त्यांनाही निश्चितच आनंद…”
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
hema malini laughed at ramdev baba
Video: गंगेत डुबकी मारणाऱ्या रामदेव बाबांनी केलं असं काही की…; हेमा मालिनींना हसू आवरेना
kiran mane shares post for maharashtrachi hasya jatra fame rohit mane
आमचा चित्रपट येतोय…; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’तील ‘या’ अभिनेत्यासाठी किरण मानेंची पोस्ट, सांगितला खास अनुभव
chhaava movie lezim scene controversy marathi actress ruchira jadhav
“चित्रपट बघण्याआधीच निर्बुद्धपणे…”, ‘छावा’च्या वादावर मराठी अभिनेत्रीचं स्पष्ट मत; म्हणाली, “माझ्या राजाला…”
marathi actor abhijeet shwetchandra and his wife announces pregnancy
“बेबी श्वेतचंद्र Coming…”, लोकप्रिय मराठी अभिनेता होणार बाबा, चाहत्यांना ‘अशी’ सांगितली गुडन्यूज, व्हिडीओने वेधलं लक्ष
actor suvrat joshi play role in vicky kaushal chhaava movie
‘दिल दोस्ती दुनियादारी’ फेम अभिनेता ‘छावा’मध्ये झळकणार! विकी कौशलबद्दल म्हणाला, “सेटवर प्रचंड मेहनत…”
Bigg Boss 18 Winner Karan Veer Mehra talk about on Rajat Dalal Viral Reaction after Bigg Boss 18 Winner Announcement
Video: “जलने दो…”, रजत दलालच्या ‘त्या’ कृतीवर करणवीर मेहराची प्रतिक्रिया, शाहरुख खानची पोज देत म्हणाला…

ब्रेकवर असलेला आमिर खान, राजकुमार संतोषींच्या चित्रपटातून करणार कमबॅक; दिग्दर्शक म्हणाले…

प्रसादने नुकतंच त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन नुकताच एक व्हिडीओ शेअर केला होता. ज्यात या व्हिडीओमध्ये तो म्हणतो की, “तुम्ही किती ही शिकला असाल चौथी स्कॉलरशिप सातवी स्कॉलरशिप, दहावी बोर्ड, १२ बोर्ड अमुक डिग्री तमुक डिग्री पण तरी जेव्हा एक वाक्य कानावर पडत ना? मागून आवाज येतो तुम्हाला काही कशातलं काही कळत नाही पुढे प्रसाद म्हणतो सगळ्या डिग्र्या पाण्यात गेल्या आहेत. प्रसादचा हा मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत होता.

प्रसाद ओकने आजवर अनेक चित्रपटांतून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. सध्या तो ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमात परिक्षकाच्या भूमिकेत आहे. ‘धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटातील प्रसाद ओकची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. या चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Story img Loader